Water  google
सातारा

सातारकरांनाे ! दाेन दिवस पाणी येणार नाही; जाणून घ्या कारण

गिरीश चव्हाण

सातारा : शहापूर पाणी योजनेच्या वाहिनीला बोगदा परिसरात गळती लागली असून, ती काढण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या कामामुळे मंगळवारी (ता. 1 जून) , बुधवारी (ता.2) शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

साताऱ्यातील काही भागांस शहापूर योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या वाहिनीला बोगदा परिसरात गळती लागल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात वाया जात हाेते. ही गळती काढण्याचे काम पालिकेने सोमवारी हाती घेतले. या कामामुळे शहापूर योजनेचा उपसा बंद ठेवण्यात आला असून, त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

यामुळे मंगळवारी गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकीच्या भागातील सकाळच्या सत्रातील, तसेच बुधवारी काही भागांतील पाणीपुरवठा कमी खंडित होणार आहे.

या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT