Satara Latest Marathi News 
सातारा

फलटण-पुणे लोहमार्गाचे हिंदुरावांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरल्याचा जास्त आनंद : मंत्री प्रकाश जावडेकर

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकासाची दृष्टी आहे. देशातील रेल्वेचे चित्र बदलावे ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. स्वच्छतेवर विशेष ध्यान देण्यात आल्याने स्वच्छ भारत अभियानात रेल्वेची व्यवस्थाच आदर्श भारताची एक प्रेरणा बनली आहे. फलटण-पुणे लोहमार्गाचे स्व. हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जात आहे याचा आपणास आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेचा जावडेकर यांनी दिल्ली येथून ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनित शर्मा, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांची ऑनलाईन उपस्थिती होती. फलटण रेल्वे स्थानकातील व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, मंडल रेल प्रबंधक रेणू शर्मा, अतिरिक्त महाप्रबंधक बी. के. दादाभाई, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, श्रीमती मंदाकीनी नाईक-निंबाळकर, ॲड. जिजामाला नाईक-निंबाळकर, प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव आदींची उपस्थिती होती.

या रेल्वेच्या माध्यमातून फलटण हे थेट पुण्याशी जोडले जाणार आहे याचा फायदा शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी या सर्वांना होणार असल्याचे निदर्शनास आणून जावडेकर म्हणाले, रेल्वेतील पूर्वीचे दुर्गंधीयुक्त फलाटांचे चित्र बदलले आहे. मुख्य मार्गांवरील रेल्वेतील आधुनिक बायो स्वच्छतागृहे, स्वच्छ रेल्वे पटरी व रेल्वे स्थानके यामध्ये अनेक बदल होत असताना दिसत आहेत व पुढील काळातही ते होत राहतील. अनेक वर्षे जी रेल्वे धीम्या गतीने चालत होती, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे बदल झाल्याने आता तीने वेग घेतला आहे. या पाठीमागे पंतप्रधान मोदी यांची रेल्वेचे चित्र बदलण्याची इच्छा व रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची उत्कृष्ट कार्यशैली कारणीभूत असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.

रेल्वे मार्गासाठी वडील स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी तेवीस वर्षे संघर्ष केला. आज त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे, परंतु ते नाहीत याचे दुःख आहे. परंतु त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याने आपली छाती अभिमानाने फुलली असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. या रेल्वेसाठी रेल्वे मंत्री पियूष गोयल, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळेच फलटणकरांना या रेल्वेचे दालन उघडे झाल्याचे खा. निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्तविक खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. या नंतर दिल्ली येथून मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर फलटण येथे उपस्थित मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य वाणिज्य निरीक्षक संजीव सोन्ना यांनी केले. आभार रेणू शर्मा यांनी मानले.

फलटण-लोणंद-पुणे रेल्वेला 'लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर' नाव द्या : उदयनराजे 

फलटणच्या रेल्वे मार्गासाठी स्व. हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यांच्या संघर्षामुळेच रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात आले, त्यामुळे फलटण-लोणंद-पुणे या रेल्वेला 'लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर' असे नाव देण्यात यावे, अशी जाहीर मागणी यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास समर्थन दिले.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT