Satara Latest Marathi News 
सातारा

बिल वसुलीचा तगादा न थांबल्यास आंदोलन; फलटणकरांचा महावितरणला कडक इशारा

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : महावितरणने सामान्य नागरिकांच्या पाठीशी लावलेला वीजबिल वसुलीचा तगादा थांबवावा, अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या निवेदनामध्ये गेल्या दहा महिन्यांची विजेची थकबाकी माफ करावी व ज्या ग्राहकाचे वीज कनेशन तोडलेले आहे ते त्वरित चालू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जानेवारीचे बिल व थकीत बिलाचे समान दहा महिन्यांचे टप्पे करून मिळावेत, असे न करता जर कोणाचे वीज कनेक्‍शन तोडले तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख, भाजप शहर अध्यक्ष अमोल सस्ते, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, मेहबुबभाई मेटकरी, कॉंग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे फलटण तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, सुभाष गायकवाड, सनी कदम, वसीम मणेर, राजू काळे, तानाजी कदम, रणजित भुजबळ, तुषार राऊत, मोहन पोतेकर, शंकर मुळीक, विशाल पोतेकर, रामभाऊ शेंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Love Marriage : लव्ह मॅरेजमुळे सासूनं छळलं, मुलगा होऊनही पतीची नाही साथ; शेवटी ५ महिन्याच्या बाळाला सोडून 'ती'ने सोडलं जग

Junior Hockey World Cup : आजपासून ज्युनियर हॉकी विश्वकरंडक; यजमान भारताला तिसऱ्या विजेतेपदाची संधी...

PMC Exam Postponed : १६९ जागांसाठीची पुणे महापालिकेची ऑनलाइन परीक्षा स्थगित; नव्या तारखेची लवकरच घोषणा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 'कांदा चाळीसाठी प्रतिटन चार हजारांचे अनुदान' ; राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीचा माेठा निर्णय..

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT