Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यात जलवाहिनीत प्लॅस्टिकच्या बाटल्या; पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

गिरीश चव्हाण

सातारा : खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जलवाहिनीमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या अडकलेल्या आढळल्या. या बाटल्या काढल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिकेस यश आले. या कामासाठी बगाडे हॉस्पिटलसमोरील नव्याने केलेल्या मुख्य रस्त्याची खुदाई पालिका कर्मचाऱ्यांना करावी लागली.
 
साताऱ्यातील रविवार पेठेतील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी नुकतेच त्यासाठीचे काम हाती घेतले. यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेसमोर असणारा मुख्य रस्ता खोदण्यात आला. खुदाई पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. तपासणीत जलवाहिनीमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या अडकल्याचे आढळले. या बाटल्या काढल्यानंतर खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला. 

या कामावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर उपस्थित होते. वितरण टाक्‍यांच्या परिसरातील नागरिक प्लॅस्टिकच्या बाटल्या टाक्‍यांजवळ टाकत असावेत, असा अंदाज या वेळी व्यक्‍त करण्यात आला. यानुसार नागरिकांना पाण्याच्या वितरण टाक्‍यांच्या परिसरात, तसेच टाक्‍यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या न टाकण्याचे आवाहन मनोज शेंडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT