Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

छावणीचालकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रयत्नशील; कॉंग्रेस नेत्याची ग्वाही

शशिकांत धुमाळ

निमसोड (जि. सातारा) : जनावरांच्या छावणीचालकांच्या रखडलेल्या बिलांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष व कॉंग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी छावणीचालकांना दिले. 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व फलटण तालुक्‍यांतील छावणीचालकांनी अनेक दिवसांपासून आपल्या रखडलेल्या बिलांप्रश्‍नी व अडीअडचणींसंदर्भात न्याय मिळावा, यासाठी श्री. देशमुख यांची भेट घेऊन जनावरांच्या छावण्यांच्या बिलासंदर्भात साकडे घातले. त्यावर श्री. देशमुख यांनी लवकरात लवकर संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन सर्व प्रश्नांचा तातडीने पाठपुरावा करून प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. 

याबद्दल छावणीचालकांनी श्री. देशमुख यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी रासप जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन खाडे, सदाशिव खाडे, सोमनाथ भोसले, तुषार ओंबासे, गजानन भोसले, नामदेव सावंत, सुभाष काटकर, सुभाष खाडे, प्रमोद जगदाळे, रामचंद्र जगदाळे, धर्मराज जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT