Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

नामांकित नाटक कंपन्यांची साताऱ्यावर फुली; कलामंदिराच्या रखडलेल्या कामाचा परिणाम

गिरीश चव्हाण

सातारा : तांत्रिक, अतांत्रिक कारणांमुळे येथील शाहू कलामंदिराच्या दुरुस्तीचे काम अजूनही रखडलेले असून, ते कधी पूर्ण होईल, याचे उत्तर सध्यातरी पालिका पदाधिकाऱ्यांकडे नाही. पाठपुरावा करूनही दुरुस्तीचे काम मार्गी लागत नसल्यामुळे नामांकित नाटक कंपन्यांनी साताऱ्यावर फुली मारत इतर ठिकाणी नाट्यप्रयोग सुरू केले आहेत. पालिकेच्या विस्कळित कारभारामुळे शाहू कलामंदिरात तिसऱ्या घंटेचा आवाज सध्यातरी घुमणे अशक्‍य आहे. 

शाहू कलामंदिराच्या दुरुस्ती, सुशोभीकरणाचे महामॅरेथॉन काम गेली अनेक महिने पालिकेकडून सुरू आहे. तांत्रिक, अतांत्रिक कारणे, पदाधिकाऱ्यांच्या रुसव्याफुगव्यांमुळे हे काम नंतरच्या काळात रखडले. लॉकडाउनमुळे बंद पडलेले हे काम अनलॉकमुळे पुन्हा सुरू झाले. मात्र, त्याला गती नाही. या कामाला गती मिळावी, यासाठी साताऱ्यातील नाट्यप्रेमी, वितरकांनी याबाबतचे पत्र मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्षा माधवी कदम यांना दिले. याच कामाबाबत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वत: फोनवरून अभिजित बापट यांच्याशी चर्चा केली होती. 

या वेळी शाहू कलामंदिराच्या दुरुस्तीचे काम तत्काळ मागीं लावण्याचे आश्‍वासन दामले यांच्यासह इतरांना देण्यात आले. यानंतर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दुरुस्तीचे हे काम 15 दिवसांत पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. श्री. शेंडे यांनी जाहीर केलेले ते 15 दिवस संपले तरी काम अजून बाकी आहे. जानेवारीतील 31 तारखेला एका प्रयोगाची तयारी मुंबईस्थित नाटक कंपनीने सुरू केली होती. मात्र, दुरुस्तीच्या कामामुळे कंपनीने साताऱ्यातील तो प्रयोग रद्द केला.

मार्चमध्ये प्रसिध्द नाटकांचा महोत्सव 

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील 20 तारखेला एका प्रयोगाचे तसेच मार्च महिन्यातील सात तारखेपासून नटरंगी नार, सही रे सही, अलबत्या गलबत्या, शांतेचं कार्ट चालू आहे, व्हॅक्‍युम क्‍लिनर, एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांचा समावेश असणारा महोत्सव आयोजित करण्याची तयारी सध्या सुरू आहे. त्यांची तयारी सुरू असली तरी दुरुस्तीचे रखडलेले काम या नाट्यमहोत्सवाच्या आड येण्याची चिन्हे आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळमध्ये निवडूण आलेले महायुतीचे संचालक गावातच राहणार; अध्यक्ष निवडीत दगाफटका होणार का?, संचालकांकडून स्पष्टीकरण

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

Crime News: दहा हजारांचे कर्ज, ७५ हजारांची मागणी; मायच्या काळजाचा तुकडा हरपला!

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय

SCROLL FOR NEXT