Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

वाठार बॅंकेत धोका वाढला; खातेदारांची 'आगीतून उठून फुफाट्यात' अशी गत!

अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि. सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या येथील शाखेचे एक वर्षापूर्वी बाजार चौकातील एका खासगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आले असून, शाखेच्या लोखंडी जिन्यातून ये-जा करताना वयोवृद्धांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात गंभीर अपघात होऊ शकतो. स्थलांतरामुळे खातेदारांची आगीतून उठून फुफाट्यात अशी अवस्था झाली आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची येथील शाखा ही बाजार चौकातील एका खासगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर होती. या शाखेमध्ये वाठार स्टेशनसह परिसरातील जाधववाडी, विखळे, तळीये, बिचुकले, नलवडेवाडी, तडवळे संमत वाघोली या गावातील शेतकरी, व्यापारी, शिक्षक, तसेच ग्रामपंचायतींची खाती आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या किसान पेन्शन योजनेतील रक्कमही या बॅंकेतील खात्यात जमा होत असल्याने या ठिकाणी सतत लोकांची वर्दळ सुरू असते. 

एक वर्षापूर्वी या शाखेच्या जागेचा करार संपल्याने शाखा स्थलांतर करून ही शाखा स्टेशन रस्त्यावरील एका खासगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. या ठिकाणी ये-जा करण्यासाठी लोखंडी जिन्याचा वापर करण्यात आला असून, हा जिना चढणे व उतरण्यासाठी किचकट असल्याने वयोवृद्धांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे. लोखंडी पायऱ्या चढत किंवा उतरत असताना वयोवृद्धांचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो. यासाठी बॅंकेने वयोवृद्धांसाठी रस्त्यालगत विशेष सोय करावी, अशी मागणी होत आहे. 

मुख्य कार्यालयाचा निर्णय 

वाठार स्टेशन शाखा कार्यालयात ये- जा करताना होणाऱ्या गैरसोयीबाबत शाखाप्रमुख बी. बी. दोरके यांच्याशी संपर्क साधला असता शाखा कोठे घ्यायची आदी अधिकार आम्हाला नसून 
सर्व अधिकार मुख्य कार्यालयाकडे असतात. तेव्हा याबाबत मी अधिक काही बोलू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT