Satara Latest Marathi News 
सातारा

'आमचा गाव'मधून कुडाळचा कायापालट करणार; उपसभापती सौरभ शिंदेंची ग्वाही

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने मोठ्या विश्‍वासाने रयत पॅनेल व कुडाळ बहुजन विकास आघाडीकडे सत्ता सोपविली आहे. जनतेच्या विश्वासास पात्र राहून आमचा गाव आमचा विकास योजनेच्या माध्यामातून विकासकामांचा डोंगर उभा करून गावचा कायापालट करणार असल्याचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी सांगितले. 

येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ""ग्रामपंचायतीत सत्तापालट झाल्यानंतर गावातील जनतेची विकासकामांबाबतची अपेक्षापूर्ती करणे हे सत्ताधारी म्हणून आमची जबाबादारी आहे. कुडाळ हे तालुक्‍यातील मोठी लोकसंख्या असणारे गाव आहे. त्यामुळे गावाचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने रयत पॅनेल व कुडाळ बहुजन विकास आघाडी दोघेही प्रयत्नशील आहेत. अल्पावधीत कुडाळचा विकासात्मक चेहरामोहरा बदललेला दिसेल.'' 
याप्रसंगी बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रतापगड करखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, संजय शिंदे, धैर्यशील शिंदे, दिलीप वारागडे, राहुल ननावरे, महादेव शिंदे, आशिष रासकर, चंद्रकांत गवळी, समिर डांगे, महेंद्र शिंदे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

या वेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व उपसभापती सौरभ शिंदे यांच्या प्रयत्नातून येथील मराठी शाळा ते पुलस्ती मंदिर रस्ता व नागोबा माळ ते खंडोबा मंदिर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेसाठी शौचालय युनीट बांधकाम, तसेच कातकरी समाजाच्या लाभार्थीच्या घरकुलाची उभारणी करणे आदी विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. उपसरपंच सोमनाथ कदम यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT