Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

शाब्बास! गवंड्याच्या पोरीची सुवर्णपदकाला गवसणी; कर्नाटक राज्यात साताऱ्याची सोनाली प्रथम

पुरुषोत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : वेळे (ता. वाई) येथे वास्तव्यास असलेली व मूळची कर्नाटकमधील असणारी सोनाली देवानंद राठोड हिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. सोनाली ही बंगळूर येथील राजीव गांधी विद्यापीठातून बीएस्सी नर्सिंगमध्ये 81 टक्के गुण मिळवून कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांत मिळवल्याने तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. 

सोनाली हिचे माध्यमिक शिक्षण वेळे येथील अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालयात व उच्च माध्यमिक शिक्षण वाई येथील किसन वीर महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने बीएस्सी नर्सिंगसाठी विजापूर येथील बी. एम. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यामध्येही सलग तीनही वर्षे ती कॉलेजमध्ये प्रथम आली होती. सध्या ती पुणे येथे भारती हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. 

सोलो ट्रिपला जाताय.. मग, या खास गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

अतिशय गरीब कुटुंबातील व प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोनालीने यशाला गवसणी घातली. तिची आई शारदा मजुरी, तर वडील देवानंद राठोड हे गवंडी काम करतात. तिला अजून एक बहीण व एक भाऊ आहे. या तिघांचेही शिक्षण पूर्ण करताना आई-वडिलांना खूप हलाखीत दिवस काढताना, प्रसंगी पोटाला चिमटे काढावे लागले. भाऊ राजेंद्रनेही आई-वडिलांसोबत काम करून सोनालीच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी मदत केली. या विविध परिस्थितीचा सामना करत सोनालीने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तिच्या आईवडिलांना खूप मोठा आनंद झाला. आपल्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सोनाली अभिमानाने सांगते. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्राचार्य, सरपंच, ग्रामस्थांनी कौतुक करून अभिनंदन केले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT