Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाड शहर अंधारात! वाखाण भागात खांबावरील 50 एलईडीची चोरी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील वाखाण भागातील शिक्षक कॉलनी ते पवार वस्तीपर्यंत जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पालिकेने लावलेल्या 50 एलईडीचे बल्ब चोरीस गेले आहेत. परवा रात्रीपासून बल्ब गायब आहेत. अनोखळी व्यक्तीने चोरून नेल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगत आहेत. 

पालिकेत दुपारी त्याची माहिती समजल्यानंतर खळबळ उडाली आहे. परवा रात्री उशिरा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. मात्र, पालिकेने पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पालिकेची सव्वा लाखाचे बल्ब चोरीस गेल्याने त्या भागातील नागरिकही संतापले आहेत. 

बल्ब नसल्याने भागात अंधार आहे. शिक्षक कॉलनी ते वाखाण परिसरात पवार वस्तीपर्यंत पालिकेने पोल टाकून तेथे दिवाबत्तीची सोय केली आहे. काहीच दिवसांपूर्वी पालिकेने चांगल्या दर्जाचे एलईडीचे बल्ब बसवले आहेत. त्या भागात जवळपास 50 पोल आहेत. त्यावर प्रत्येकी एक एलईडी आहे. ते बल्ब अनोळखीने चोरल्याने खळबळ उडाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचं गणित बदलणार? 'या' भागात पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी ऑक्टोबर हीट तापदायक ठरणार

Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनाचा तिढा कायम; आठ दिवस उलटले, सरकार आणि आंदोलकांत संवादच नाही

Pending Funds: पोषण आहाराची घडी विस्कटली;पाच महिन्यांपासून निधी ठप्प; ३३१ शाळांमधील यंत्रणा संकटात

Maharashtra Monsoon: महाराष्ट्रातून मॉन्सून परतला! हवामान विभागाची मोठी घोषणा; आता संपूर्ण देशातून कधी घेणार निरोप?

MPSC Student Agitation : पेपरच फुटणार असतील तर आमच्या भविष्याचे काय? - एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

SCROLL FOR NEXT