सातारा

सातारा जिल्ह्यातील वाईत कार-दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिला गंभीर जखमी

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : वाई-पाचवड रस्त्यावर बावधन ओढा येथे मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. रविवारी (ता. 3) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, मोटार चालकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

वनिता प्रवीण भोसले (वय 35, केसरकर पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या व त्यांचे पती प्रवीण हे दोघे होंडा ऍक्‍टिव्हा (एमएच 11 बीवाय 6062) वरून रविवारी दुपारी वाईला किसन वीर महाविद्यालयात पुस्तके आणण्यासाठी आले होते. प्रवीण हे गाडी चालवत होते. वनिता या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. तेथील काम झाल्याने परत साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. 

बावधन ओढ्यानजीक दोन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून वाईकडे येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात वनिता व प्रवीण हे दोघेही दुचाकीवरून लांब फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मोटारचालक राजेंद्र रामचंद्र रसाळ (रा. सह्याद्रीनगर) यांच्यावर वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सुभाष धुळे हे तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT