Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

साताऱ्याच्या पोरानं जिंकलं दिल्लीचं तख्त; 'यूपीएससी'त प्रथमेश देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला!

संतोष साबळे

शिवथर (जि. सातारा) : आरफळातील संत ज्ञानेश्वर माउलींच्या पायी वारीचे जनक संत हैबतबाबा यांच्या पावन भूमीत नेहमीच ज्ञानाचा जागर होताना दिसत आहे. अशाच छोट्याशा आरफळ गावच्या प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्वल करून सन 2019 च्या झालेल्या UPSC परीक्षेत Central Armed Force Assistant Commandant पदी भारतात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

सातारा खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन, आरफळ ग्रामपंचायतचे पहिले सरपंच कै. प्रल्हाद रामचंद्र पवार-पाटील यांचे प्रथमेश हे नातू आहेत. प्रथमेश यांचे शिक्षण निर्मल कॉन्व्हेंट, सातारा येथे पहिली ते दहावीपर्यंत झाले. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सातारा येथे एक्स्टर्नल अकरावी व बारावीचे शिक्षण घेत, त्याच दरम्यान सातारा येथील चाफेकर क्लासेस येथे दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यास करून पुढील शिक्षणासाठी पुण्यात जावून वाडिया कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर डिस्कशन पदवी घेतली. सलग दोन वर्ष पुण्यातील युनिक अॅकॅडमीत पूर्णवेळ अभ्यास करून घवघवीत यश मिळवले. या यशात आई सुरेखा, वडील व चुलत्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रथमेश सांगतात. 

कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असताना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते, अशा परिस्थितीत घरात Bsc झालेले चुलते, त्यांना आलेले अपंगत्व आणि वडिलांच्या वर पडलेली संपूर्ण घराची जबाबदारी, त्यात आमच्या भावंडांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च आणि दुष्काळ अशा परिस्थितीचे चटके सहन करावे लागत होते. आजोबांपासून सुरु असलेला पारंपरिक शेती व्यवसाय, त्यात शेतमालाचे पडलेले बाजार भाव याचा मेळ घालता-घालता मेटाकुटीला वडील येत होते, अशा कठीण परिस्थितीतही मला यश साध्य करता आले, ही माझ्या कुटुंबीयांची देणं आहे. 2016 रोजी इंजिनिअरींग पास होऊन देखील युपीएससीच्या सिव्हील सर्विसची दोन वर्ष तयारी केली. मात्र, त्यात यश न मिळाल्यामुळे मी जिद्द सोडली नाही.

त्याच दरम्यान युनिक अॅकॅडमीच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि तेलंगणात पोलिस कमिशनर पदावर असणारे महेश भागवत यांनी वेळोवेळी दिलेला कानमंत्र हेच माझ्या यशाच गमक असल्याचेही प्रथमेश सांगतात. प्रथमेश यांच्या निवडीबद्दल आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश नारायण पवार-पाटील, आरफळचे सरपंच मेघा माने, उपसरपंच सुनील पवार, माजी उपसरपंच वैभव पवार, अश्विन पवार, उमेश पवार, राजेंद्र पवार यांनीही अभिनंदन केले आहे.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात 3 लाख कुणबी नोंदी, जुन्नर- खेडमध्ये सर्वाधिक दाखले; मराठा आरक्षण जीआर आधीच आकडेवारी समोर

Asia Cup 2025 AFG vs HK : अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगचा दारुण पराभव...

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

Panchang 10 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Education : राज्यात शिक्षणगळती चिंताजनक; इयत्ता नववी-दहावीतील ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणातून बाहेर

SCROLL FOR NEXT