Satara Latest Marathi News 
सातारा

घनदाट जंगलात तीन दिवस भरणारी पानेरीची वाल्मीकी यात्रा रद्द

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा)  : भाविक वर्गात मोठे महत्त्व असलेली आणि घनदाट जंगलाच्या परिसरात तीन दिवस भरणारी श्री वाल्मीकी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती पानेरी (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीने पत्रकाव्दारे दिली आहे. 

ढेबेवाडीपासून सुमारे 30 किलोमीटरवरील जंगल परिसरात महाशिवरात्रीला भरणाऱ्या श्री क्षेत्र वाल्मीकी यात्रेला विविध जिल्ह्यांसह वाड्यावस्त्यांतून भाविक मोठी गर्दी करतात. यात्रा पूर्णपणे शाकाहारी असते. यात्रेकरू व भाविकांसाठी भारुड, भजन, कीर्तनासह पारायण सोहळ्याचे आयोजन असते. ग्रामस्थ, ग्रामपंचायत व श्री क्षेत्र वाल्मीकी देवस्थान ट्रस्टने यात्रा रद्द करण्याचे ठरवल्याचे सरपंच रंजना पवार यांनी पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांना पत्राव्दारे कळविले आहे. 

ता. 9 ते 11 तारखेदरम्यान होणारी यात्रा रद्द केली असून भाविकांनी गर्दी करू नये तसेच पोलिसांनी आवश्‍यक बंदोबस्त ठेऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंतीही ग्रामपंचायतीने पत्रात केली आहे. सध्या विविध जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यात्रा रद्द केली असून भाविकांनी सहकार्य करून दंडात्मक करवाईसारखे प्रसंग टाळावेत, असे आवाहन सरपंच रंजना पवार यांनी केले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT