Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

खटावात बेशिस्त पार्किंगचा व्यावसायिकांना अडसर; दुकानांपुढे ग्राहकांऐवजी वाहनांचीच गर्दी!

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याची मुख्य बाजारपेठ असणारे वडूज शहर. त्यामुळे येथे विविध लहान-मोठ्या व्यवसायांसह दुकानांची मोठी रेलचेल. मात्र, येथील व्यावसायिकांना दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. दुकानांसमोर ग्राहकांऐवजी वाहनांचीच अधिक गर्दी दिसून येत आहे. 

तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय येथे लहान-मोठ्या व्यवसायांसह विविध व्यवसायांचीही रेलचेल आहे. शहरातील बस स्थानक परिसर ते दिवाणी व फौजदारी न्यायालय, छत्रपती संभाजीराजे चौक, दहिवडी-कऱ्हाड रस्ता, कातरखटाव रस्ता हा भाग अधिक वर्दळीचा आहे. त्यामुळे या भागांत गेल्या काही वर्षांत नव्याने बाजारपेठ विस्तारली आहे. त्यामुळे या भागांत अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने थाटली आहेत. 

शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असल्याने पार्किंगची मोठी समस्या कायम आहे. नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख मार्गावर वाहन पार्किंगसाठी रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्यांचे रेखांकन केले आहे. मात्र, बस स्थानक, छत्रपती संभाजीराजे चौक, दहिवडी- कऱ्हाड रस्ता या भागांत अधिक वर्दळ असल्यामुळे दुकानांसमोरच दुचाकी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यामुळे अनेकवेळा वाहनचालक आपली दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे ग्राहकांना दुकानात जाण्यासाठी अनेकवेळा एकमेकांना खेटून लावलेल्या दुचाकी वाहनांमधून कशीबशी वाट काढत दुकानांत जावे लागते. 

ग्राहकांची दुकानात येताना होणारी अडचण लक्षात घेऊन अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या प्रवेशद्वारात लोखंडी रॅक लावल्या आहेत. मात्र, या रॅकसमोरदेखील अनेकवेळा दुचाकी वाहने लावलेली दिसून येतात. कोरोना संसर्ग व लॉकडाउननंतर बाजारपेठ खुली होऊन व्यवसाय कसाबसा उभारी घेत असताना व्यावसायिकांना आता दुकानांसमोरच बेशिस्त वाहनांच्या पार्किंगचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांना दुकानांत येण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्याचा व्यवसायावरही परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे. 

मुख्य रस्त्यावर दुकानांसमोरच दुचाकी वाहन लावून अनेकजण परगावी जातात. दिवसभर ही वाहने याच ठिकाणी उभी असतात. त्यामुळे दुकानांसमोर दुचाकी वाहनांचीच मोठी गर्दी होते, त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.'' 

-गणेश राऊत, व्यावसायिक, वडूज 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि अभिषेक रांका चर्चेत सहभागी; सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार?

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT