Satara Latest Marathi News 
सातारा

कोरेगावात जनावरांच्या दवाखान्यात डॉक्‍टर झालेत कंपाउंडर!

पांडुरंग बर्गे

कोरेगाव (जि. सातारा) : येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात गेल्या सहा वर्षांपासून व्रनोपचारक व परिचर ही दोन पदे रिक्त असल्यामुळे पशुधनविकास अधिकाऱ्यांना अक्षरशः व्रनोपचारक व परिचर पदाचेही काम करावे लागत आहेत. दरम्यान, सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारलेली सुसज्ज तालुका वैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचीही केवळ देखभाल आणि दुरुस्तीअभावी दुर्दशा सुरू झाली आहे. 

कोरेगाव तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात सर्व प्रकारच्या जनावरांवर वेळेत आणि व्यवस्थित उपचार सुरू असताना सहा वर्षांपूर्वी येथे कार्यरत व्रनोपचारक आणि परिचर पदावरील कर्मचारी बदलून गेले. मात्र, तेव्हापासून येथे ही दोन्ही पदे भरली न गेल्याने रिक्त आहेत. सद्या येथे सहायक आयुक्त डॉ. आझाद कादरभाई, सहायक आयुक्त डॉ. डी. पी. लोखंडे हे दोघे दररोज येणाऱ्या सुमारे 30 ते 35 आणि महिना सुमारे एक हजार जनावरांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार, आवश्‍यक शस्त्रक्रिया, वेळोवेळी गावोगावी जाऊन लसीकरण करत आहेत. त्यामध्ये त्यांना सातारा कार्यालयातून देण्यात आलेला रात्र पहारेकरी, तसेच पशुपालक मदत करत आहेत.

मात्र, त्यामध्ये त्यांना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. जनावरांच्या गंभीर दुखापतीत, आजारात शस्त्रक्रिया करताना, इंजेक्‍शन देताना, तसेच बॅंडेज करताना त्यांच्या मदतीला प्रशिक्षित परिचर, व्रनोपचारक नसल्याने अनर्थ घडण्याची, प्रसंगी एखादे जनावर दगावण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. व्रनोपचारक व परिचर नसल्याने पशुपालकांनाही जनावरांवरील उपचाराची कसलीही माहिती नसताना मदत करताना खूप अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात तातडीने व्रनोपचारक व परिचर ही पदे भरावीत, अशी मागणी पशुपालकांमधून केली जात आहे. 

इमारतीची दुरवस्था 

दरम्यान, तालका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दिवसरात्र सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. प्रवेशद्वाराची तोडफोड करण्यात आली आहे. ठिकठिकाणी खिडक्‍यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. परिसरामध्ये दलदल निर्माण झालेली आहे. चांगल्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.

कोरेगाव तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात व्रनोपचारक व परिचर ही पदे रिक्त असून, ती भरावीत, असा प्रस्ताव दर तीन महिन्यांनी आम्ही वरिष्ठ कार्यालयास देत असतो. मात्र, पदे भरली जात नाहीत. तरीही आम्ही जनावरांच्या उपचारांत कोणतीही हयगय होऊ देत नाही. इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर ही दुरुस्ती होईल. सुरक्षा रक्षकाची तरतूद नाही, पण आम्ही सुरक्षा रक्षकाची मागणीही करणार आहोत.'' 
-डॉ. आझाद कादरभाई, सहायक आयुक्त, कोरेगाव तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT