Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाड-विटा-पंढरपूर मार्गावरील कृष्णा पुलाचे भिजत घोंगडे; खासदार पाटलांच्या सूचनेला ठेकेदारांचा ठेंगा

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड- विटा-पंढरपूर महामार्गावरील शहरापासूनचा जवळच्या कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्याच्या सुरू असलेल्या पुलावर वाहतुकीचा मोठा भार आहे. सातत्याने त्या पुलावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र, तरीही नवीन पुलाचे काम होत नसल्याने आश्‍चर्यच व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्याही दुर्लक्षामुळे ठेकेदारांकडून तातडीने कामाची पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे आणखी किती दिवस पुलाचे काम रेंगाळणार हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. 

शहरातून कऱ्हाड- विटा-पंढरपूर हा महामार्ग जातो. या महामार्गावरच शहराजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर पूल आहे. त्यावरून दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, महिला, प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे त्या पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्या पुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला होता. त्याचबरोबर त्या पुलावर अनेकदा वाहने बंद पडत होती. त्यामुळे त्या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सूचनेनुसार त्या पुलावरील रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, त्या पुलावरील वाहतुकीची वर्दळ कायमच आहे. त्याचा विचार करून सध्याच्या पुलाच्या शेजारीच नवीन पूल उभारण्यात येत आहे. 

हे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे, तरीही तो पूल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आश्‍चर्यच व्यक्त होत आहे. त्या पुलाच्या कामांकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षच झाले आहे. परिणामी संबंधित ठेकेदाराला वाटेल, तसेच काम सुरू झाले आहे. त्यामुळे ते काम तातडीने पूर्ण होत नाही. सध्याच्या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी कसरत होत आहे. त्याचबरोबर वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर नवीन पूल होणे हेच उत्तर आहे. त्याचा विचार करून आता तातडीने पावले उचलून काम पूर्ण करण्याची गरज आहे. 

सायकलस्वारांची मोठी गैरसोय 

कृष्णा पुलावरून विद्यानगरला शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी दररोज ये- जा करतात. त्यातील अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी सायकलवरून ये- जा करतात. त्याचबरोबर काही नागरिकही सायकलवरून जातात. त्या पुलावर अगोदरच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यातच सायकलस्वारांचा जीव गुदमरल्यासारखी स्थिती होत आहे. त्याचाही विचार करून तातडीने या नवीन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

SCROLL FOR NEXT