सातारा

Satara: बेरोजगारांची संख्या वाढली; नोकरीसाठी सहा महिन्यांत नऊ हजारांची नोंदणी

नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात मोठा उद्योग आणून युवकांचे स्थलांतर थांबविणे गरजेचे बनले आहे.

उमेश बांबरे

Latest Education News : जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीच्या संधी अल्प असूनही जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत नोकरीसाठी सेवा योजना व कौशल्य विकास कार्यालयाकडे ९७०१ जणांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांचे चार मेळावे झाले असून, या माध्यमातून ११४ जणांची निवड झाली आहे. केवळ ३० महिलांना रोजगार मिळाला आहे. नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात मोठा उद्योग आणून युवकांचे स्थलांतर थांबविणे गरजेचे बनले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सेवा योजना व कौशल्य विकास कार्यालयात आतापर्यंत पावणेदोन लाखांवर सुशिक्षित बेरोजगार युवकांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सव्वालाखांवर पुरुष, तर ५० हजारांवर स्त्री उमेदवारांचा समावेश आहे. सध्या युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या वतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी मेळावे घेण्यात येत असून, या मेळाव्यांना प्रतिसाद मिळत आहे.

अशी आहे स्थिती....

२०२४ मधील सहा महिन्यांत सेवा योजना कार्यालयाकडे तब्बल ९७०१ उमेदवारांनी नोकरी मिळेल, या आशेवर नोंदणी केली आहे. यातून केवळ ३० महिलांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात चार मेळावे झाले असून, त्यातून ११४ जणांची निवड झाली आहे. २०२० ते २०२४ च्या पाच वर्षांत जिल्ह्यातील युवकांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अल्प असले तरी समाधानकारक आहे. २०१५ मध्ये ३०१६, २०१६ मध्ये १२ हजार ५५८, २०१९ मध्ये सात हजार ६१८ युवकांना नोकरी मिळाली आहे. या आकड्यात सध्यातरी बदल होत नसल्याचे चित्र आहे.

पुणे, मुंबईकडे स्थलांतर

जिल्ह्यात मोठा उद्योग आणला गेल्याशिवाय युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार नाही. आजही युवक पुणे, मुंबईसह बाहेरच्या राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त जाताना दिसत आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार ७६१ बेरोजगारांना नोकरी मिळाल्याचे आकडेवारी सांगत आहे. कोरोनानंतर नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२० ते २०२४ मध्ये नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उलट स्वयंरोजगार करण्याकडे युवकांचा कल वाढू लागला आहे. नोकरीसाठी युवकांचे पुणे, मुंबईकडे स्थलांतर वाढले आहे.

सहा महिन्यांतील

नोंदणी

२०२४ मधील गेल्या सहा महिन्यांत सेवा योजना कार्यालयाकडे नोकरीसाठी झालेली नोंदणीची संख्या अशी आहे. जानेवारी २९२८, फेब्रुवारी ३०९४, मार्च १६३२, एप्रिल ७८८, मे ६५२, जून ६०७ एकूण ९७०१ जणांनी नोंदणी केली आहे.

संकेतस्थळावर नोंदणीचे आवाहन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार, तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने येणार आहे. या उपक्रमांतर्गत बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांनी व रोजगार देणाऱ्या विविध आस्थापनांनी, उद्योजकांनीही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Yadav Family Dispute : रोहिणी नंतर आता आणखी तीन बहि‍णींनी नाते तोडले, लाल प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह थांबेना

Sharad Pawar: सरसकट पैसे वाटण्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करू: शरद पवार : काँग्रेस संपेल असे वाटत नाही, नेमकं काय म्हणाले?

राज्यात गारठा वाढणार! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट, तर मुंबई-पुणेही गारठलं; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Capricorn Horoscope 2026: लव्ह लाईफमध्ये चढ-उतार...तर सिंगल व्यक्तींसाठी लग्नाच्या संधी; वाचा तुमचं वार्षिक राशीभविष्य

आजचे राशीभविष्य- 17 नाेव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT