सातारा

नगराध्यक्षा गांधारी : कलंक पुसण्यासाठी राजीनामा द्यावा : अशाेक माेने कडाडले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लोकनियुक्त नगराध्यक्षांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे पालिकेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गांधारीच्या भूमिकेत जाऊन दुसऱ्याला दोष
देण्यापेक्षा नैतिकतेला धरून माधवी कदम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पालिकेचे उपमुख्याधिकारी व तीन आरोग्य निरीक्षकांना दोन लाख 30 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यानंतर साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. काल नगराध्यक्षांनी दिलेल्या प्रसिद्धीत पत्रकात नगर विकास आघाडीच्या कार्यकाळातील कामांबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्याला आज श्री. मोने यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मोने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की पालिकेच्या इतिहासामध्ये अशी लाजीरवाणी घटना घडली नाही. असे असतानाही आपली अकार्यक्षमता दडविण्यासाठी आमच्या काळात विकासकामे झाली नाहीत, अशी आवई उठवून नागरिकांना विचलित करू नका. शहरामध्ये व्हायरल झालेल्या ऑडिओ क्‍लिपमध्ये कोणाकोणाची नावे आहेत, हे सातारकरांनी ऐकले आहे. त्यामुळे निराशेपोटी तुम्ही नगर विकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

सध्या कोट्यवधींचा निधी येत आहे; परंतु त्याचा दुरुपयोग कसा होत आहे हे सातारकर पाहात आहेत. आपल्या नाकाखाली आणि आपण पालिकेत उपस्थित असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली आहे. त्यावर तातडीने प्रतिक्रिया देण्याऐवजी उशिराने दुसऱ्याच्या कार्यकाळात काय झाले नाही, असा ढिंडोरा पिटत आहे. आता तर, पालिकेतून फाईल्स गायब होत आहेत. त्यामुळे आपल्याला भ्रष्टावर हा शिष्टाचार वाटत असेल.
 
मी नगराध्यक्ष असताना (कै.) आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जनतेला केंद्रबिंदू मानून अनेक विकासकामे केली. हे जनतेला माहीत आहे. सध्या विरोधी पक्षनेता म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे काम करत आहे. त्याच वेळी चांगल्या कामाला सहकार्यही करत असतो. मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्षा असूनही आपली प्रशासनावर पकड व वचक नसल्यामुळेच पालिकेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. त्याचे गांभीर्य ओळखून आपल्या कार्यपद्धतीवर आलेल्या काळ्या ठपक्‍यातून मुक्ती मिळवायची असेल, तर नैतिकता व नीतिमत्तेला धरून आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकात केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : माझं काय, हा शेवटचा… रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ; KKR ने डिलीट केलेला Video पुन्हा झाला Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या

Sarfarosh : आमिरची आपुलकी आणि सोनालीची गळाभेट; 25 वर्षांनंतर 'सरफरोश'च्या टीमला भेटून सुकन्या भारावल्या

Melissa McAtee: माझ्या जीवाचे काही बरं वाईट झालं तर ... फायझरच्या व्हिसलब्लोअरने व्हिडिओ शेअर करत केलं धक्कादायक वक्तव्य

Narhari zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! मविआच्या उमेदवारासोबतच्या व्हायरल फोटोबाबत केला खुलासा म्हणाले, "लोकांच्या आग्रहाखातर...."

SCROLL FOR NEXT