rain.jpg sakal
सातारा

सातारा : पाटणला मुसळधारेने बळिराजा सुखावला

गेले चार दिवस पश्चिम घाटात संततधार पाऊस सुरू आहे

सकाळ वृत्तसेवा

पाटण : गेले चार दिवस पश्चिम घाटात संततधार पाऊस सुरू आहे. मात्र, पाटण तालुक्याच्या पूर्व भागात तो कमी होता. आज सकाळपासून संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नदी, नाले व ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. दमदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने गेली महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळिराजा सुखावला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र, पाटण, तारळे, चाफळ आणि ढेबेवाडीच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी होतो. दमदार पाऊस पडला नसल्याने शेतातून पाणी बाहेर निघाले नव्हते. ओढे व नाले वाहू लागले नव्हते. फक्त जिरवणीचा पाऊस पडत होता.

आज सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्व भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. दिवसभर मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पाऊस एकसारखा पडत असल्याने जनजीवन विस्कळित झाले. शेतकऱ्यांनी जनावरे ही आज लवकर घरी आणली.

सव्वामहिना पावसाने दडी मारल्याने ओढे-नाले आटले होते. मात्र, आज दिवसभर पडलेल्या पावसामुळे ते खळखळून वाहू लागले आहेत. शेतात नैसर्गिक उफळे वाहू लागले असल्याने रखडलेल्या भात व नाचणी पुनर्लागणीस आता वेग येणार आहे. कोयना नदीसह तालुक्यातील इतर उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्याने बळिराजा सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT