मायणी बँक ऑफ इंडिया 
सातारा

बॅंकेच्या कामांमध्‍ये आता समस्यांचे नवे फेरे...

सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा) : येथील बॅंक ऑफ इंडियाच्या पायरीपर्यंत पोचण्यासाठी खातेदारांना किमान तासभर कडक उन्हात तिष्ठत उभे राहावे लागत आहे. पाऊस अंगावर झेलावा लागत आहे. त्यामुळे शाखा प्रमुखांनी ग्राहकांसाठी तात्पुरते निवारा शेड उभारण्यासह जलदगतीने सेवा देण्याची मागणी लोक करीत आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, मायणी अर्बन बॅंक, मनमंदिर को. ऑपरेटिव्ह बॅंक या सहकारी बॅंकांबरोबर बॅंक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बॅंकेची एकमेव शाखा आहे. येथील बाजारपेठ मोठी असून, अनेक व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार त्या बॅंकेमार्फत होत असतात. सरकारी व निमसरकारी सेवेतील सेवानिवृत्त, पेन्शनर लोकांची खातीही तेथे आहेत. शेतकरी, नागरिकांना मिळणारी विविध शासकीय अनुदाने, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शाळांची अनुदाने, बचत गटांची कर्ज प्रकरणे यासह विविध संस्थांचे आर्थिक व्यवहारही बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत होत असतात. त्यामुळे चांदणी चौकातील या बॅंकेपुढे सतत लोकांची गर्दी दिसून येते. 

अशा स्थितीत पुरेसा स्टाफ असूनही अनेकदा एकाच खिडकीद्वारे बॅंकेत देवाण- घेवाण होत असते. त्यामुळे गर्दी कमी होताना दिसत नाही. बॅंकेसाठी स्वतंत्र वायरलेस नेटवर्कची सुविधा असतानाही अनेकदा नेट नसल्याचे सांगून सामान्य अडाणी नागरिक खातेदारांना माघारी पाठवले जाते. पासबूक भरून वा छापून देण्यासही अनेकदा टाळाटाळ केली जाते. कधी कर्मचारी नसल्याचे तर कधी प्रिंटर बिघडल्याचे कारण पुढे करण्यात येते. बॅंक कर्मचारी व अधिकारी जलद गतीने सेवा देत नाहीत. त्यामुळे लोक त्रासून जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य व सुरक्षित अंतर राखण्यामुळे बॅंकेबाहेर भली मोठी रांग लागत असते. रांगेतील लोकांना कधी कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागते, तर कधी अंगावर पाऊस झेलावा लागतो. बॅंकेकडून ग्राहकांसाठी निवाऱ्याची व रांगेसाठी कसलीही स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे निवाऱ्यासाठी लोक गर्दी करून सुरक्षित अंतराचा फज्जा उडत आहे. अनेकदा सामान्य, आडाणी खातेदारांना हवी ती ग्राहक सेवा दिली जात नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी बॅंक व्यवस्थापनाने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. रांगेसाठी व्यवस्था करावी. लोकांना जलद सेवा देऊन कमीतकमी वेळेत लोक सुरक्षित घरी परत जातील याची दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. 

बॅंकेत जायचं म्हटलं, की अंगावर काटा येतो. अगदी किरकोळ कामासाठीही तास, दोन तास ताटकळत उभे राहावे लागते. कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही. सेवा जलद हवी. 
- विजयराव खलिपे, मायणी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT