सातारा

वडूज पाेलिस सतर्क; एक दाेन नव्हे तब्बल 66 जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

वडूज (जि.सातारा) : खटाव तालुक्‍यात कोरोना बाधितांची वाढती संख्या व शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी अचानक डबल सीट दुचाकीस्वारांवर कारवाईचा धडाका सुरू केला. अचानकपणे सुरू झालेल्या या कारवाईच्या मोहिमेने दुचाकीस्वारांचेही चांगलेच धाबे दणाणले. पोलिसांनी 66 दुचाकीस्वारांवर कारवाई करून 16 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला.

तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढू लागली आहे. परिसरातील मायणी, डांभेवाडी, बनपुरी, खरशिंगे आदी गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. वडूज हे खटाव तालुक्‍याचे मुख्य व मध्यवर्ती ठिकाण आहे. तहसीलदार कार्यालय, पोलिस उपअधीक्षक कार्यालय, पोलिस ठाणे, बस स्थानक अशी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये याठिकाणी आहेत. त्यामुळे कामकाजानिमित्त नागरिकांची येथे सतत वर्दळ दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनचे नियम काहीसे शिथिल झाल्यानंतर मात्र, शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच परिसरातील गावांतील लोकांचीही गर्दी होत आहे. रस्त्यांवर दोन्ही बाजूंना दुचाकी, चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी असताना दिसत आहेत, तर अनेक दुकानांसमोरही नागरिकांची गर्दी दिसत आहे. तालुक्‍यात कोरोना बाधितांची वाढती संख्या, तसेच परिसरातील गावांतून शहरात येणाऱ्या- जाणाऱ्या दुचाकी वाहनांचीही मोठी वर्दळ दिसून येत आहे. विशेषत: सकाळी नऊ ते दुपारी बारा एक वाजेपर्यंत शहरात वर्दळ दिसून येते. अनेक दुचाकी वाहनांवर दोन ते तीन जण प्रवास करताना दिसून येत आहेत. 

त्यामुळे डबल सीट दुचाकीस्वारांवर पोलिस निरीक्षक अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी येथील आयलॅंड चौकात कारवाईचा धडाका सुरू केला. तास दोन तासांच्या कालावधीत 66 दुचाकीस्वारांवर कारवाई करून 16 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टंचाईला पुरून उरलं ते पाणी

रेशनिंग दुकानदारांचा ठाकरे सरकारला दणका; धान्य वाटप बेमुदत बंद

हे सगळं माझ्याच वाट्याला का, हा विचार बाजूला करुन त्यांनी शाळेचे रुपडेच पालटले


त्यांच्या हट्टाला खंबीरपणे नाही म्हणण्याचे तिने धाडसही दाखविले

कऱ्हाडातील 19 हजार मिळकतदारांची चिंता मिटणार ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT