सातारा

ठाण्यातील अपहृत मुलीची साताऱ्यात सुटका; मुंबईतील युवकास अटक

उमेश बांबरे

सातारा : ठाण्यातील कस्तुरबा मार्गावरून अल्पयीन मुलीचे अपहरण करून साताऱ्यात आलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेऊन संबंधित मुलीची सुटका केली. दिनेश परशुराम शिर्के (वय 22, रा. कुलुपवाडी इंदिरानगर, बोरिवली पूर्व, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे.
 
कस्तुरबा मार्ग ठाणे येथून लहान मुलीचे अपहरण करून एक जण सातारा शहरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांच्या पथकाला या संशयिताचा शोध घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार जऱ्हाड यांच्या पथकाने सातारा बस स्थानक परिसर व महामार्गाशेजारील लॉजमध्ये तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही.

मसाई पठारावर नवरंगांचा उत्सव : रानफुलांना आला बहर

त्यावेळी स्थनिक गुन्हे शाखेचे पथक महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना एका मालट्रकमधून हा संशयित मुलीसह कोल्हापूरकडे जाताना सापडला. पोलिस पथकाने या मालट्रकचा पाठलाग केला. हा मालट्रक थांबवून संशयितासह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. दिनेश शिर्के असे अपहरणकर्त्या युवकाचे नाव आहे. अपहृत मुलीसह संशयित युवकास बोरिवली (मुंबई) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

मी देखील शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- भगतसिंग कोश्यारी 

पोलिस अधीक्षकांकडून अभिनंदन 

या कारवाईत प्रसन्न जऱ्हाड यांच्यासमवेत सहायक पोलिस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, ज्योतिराम बर्गे, हवालदार दीपक मोरे, शरद बेबले, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, चालक संजय जाधव, मोना निकम, राधा जगताप, तनुजा शेख यांनी भाग घेतला. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT