सातारा

गडकर आळी, जैतापूरातील घरफोड्या उघडकीस; साताऱ्यातील व्यापारी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

सातारा : गडकर आळी व जैतापूर (ता. सातारा) येथील घरफोड्या तालुका पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. पोलिसांनी चोरी करणाऱ्याबरोबरच चोरीचा माल घेणाऱ्यालाही अटक केली आहे. अर्जुन नागराज गोसावी (वय 32, रा. सैदापूर), चेतन प्रकाश साळवी (वय 33, रा. सदाशिव पेठ) अशी त्यांची नावे आहेत.
 
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना निरीक्षक सजन हंकारे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ते पथक सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेऊन होते. या दरम्यान त्यांना एक संशयित हा चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता.

त्यामध्ये गोसावीला पकडण्यात आले. त्याने गडकर आळी येथून एलईडी टीव्ही व इतर साहित्य, तसेच जैतापूर येथून तांब्याच्या तारांचे बंडल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ते साहित्य हस्तगत केले. मात्र, तांब्याच्या तारा साळवीला विकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी साळवीकडून तांब्याच्या तारांचा माल हस्तगत केला. संशयिताकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, नीतिराज थोरात हे या कारवाईत सहभागी होते.

यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झटकली गेली मरगळ

जावळीच्या पुरवठा शाखेत वन मॅन शो

दुधाचा भाव 34 वरून 20 रुपयांपर्यंत आला खाली

दुष्काळी कलंक पुसल्याने माणवासीय सुखावले

कऱ्हाड : अत्याचार करुन खून केल्याने सुर्लीतील एकास जन्मठेप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT