सातारा

पोलिसांची कृष्णकृत्ये लपविण्यासाठी वर्षा देशपांडेंवर खोटा गुन्हा : ऍड. शैला जाधव

प्रवीण जाधव

सातारा : सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिकाराचा गैरवापर करून तमन्नावर दबाव आणून ऍड. वर्षा देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपली कृष्णकृत्ये लपविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा प्रकार दुर्दैवी आहे. शेख यांच्या कार्यपद्धतीबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. योग्य त्या ठिकाणी आम्ही त्या पुरव्यानिशी मांडणार असल्याचा इशारा दलित महिला विकास मंडळाच्या ऍड. शैला जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की आम्ही 24 वर्षांपासून महाराष्ट्र लिगल सर्व्हिस ऍथॉरिटीशी संलग्न असलेले मोफत कायदा सल्ला केंद्र चालवतो. ऐश्‍वर्या जाधव व तमन्ना मुजावर या दोन महिला सोमवारी काहीतरी वाद असल्याने या केंद्रात आल्या होत्या. त्या वेळी तमन्ना आमच्या ऑफिसमधून जाईना म्हणून आम्ही शहर पोलिस ठाण्यात फोन केला.

थदाळे सोसायटीचा शिपाई तब्बल 57 महिने पगारापासून वंचित!

त्यांची गाडी आल्यावर दोघींना तेथे पाठवले. तेथे रात्री 10 वाजेपर्यंत कसलीच तक्रार घेतली नाही. उलटपक्षी त्यांचा समझोता लिहून घेतला. याबाबत आम्ही पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व समीर शेख या दोघांनाही कल्पना दिली होती.

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडेंवर खंडणीचा गुन्हा

काल सकाळी समीर शेख यांनी अकराला दोघींना पुन्हा बोलावून घेतले. तमन्ना यांना सकाळी 11 वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत बसवून ठेवले. तिच्यावर सातत्याने प्रेशर करून ऍड. देशपांडे यांच्यावर खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. या दरम्यान त्यांनी वारंवार फोन करूनही ऐश्‍वर्या पोलिसांकडे गेली नाही.

सावलीत गणेशोत्सवानिमित्त यंदा आरोग्य महोत्सवाची संकल्पना

हे समजल्यावर ऍड. देशपांडे यांनी शेख यांना फोन केला होता. त्यांनी ऐश्‍वर्या यांना पाठवून द्या, असे सांगितले होते. त्यानुसार तिला तिकडे पाठवून दिले; परंतु त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तमन्नावर दबाव टाकून समीर शेख यांनी अधिकाराचा गैरवापर करून ऍड. देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शेतकऱ्याच्या वारसांना वीज वितरणचा आधार 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Man Ki Baat : बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक

Latest Marathi News Update : उध्दव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही - उद्धव ठाकरे

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

SCROLL FOR NEXT