Satara Latest Marathi News 
सातारा

सहकाराला मारक असलेली भाजपप्रवृत्ती 'कृष्णा'त रोका; कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : सहकाराला मारक असलेली भाजपसारखी प्रवृत्ती रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यातून बाजूला ठेवण्यासाठी दोन्ही मोहित्यांना एकत्रित करून एकच पॅनेल करावे, राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे कृष्णा कारखाना निवडणुकीतही एकच पॅनेल असावे, असा आग्रह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी धरला. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील यांनी एकत्रित बैठक घेऊन कृष्णा कारखान्याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले. त्या वेळी पक्षातील पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी एकाच पॅनेलचा आग्रह धरला. 

कृष्णा कारखाना निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची आहे. त्या निमित्ताने चाचपणी सुरू आहे. अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी दोन्ही पक्षातून प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पक्षातही खलबते सुरू आहेत. कॉंग्रेस त्यात आघाडीवर आहे. काही कार्यकर्त्यांनी शनिवारी आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काल सायंकाळी कल जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्याला आमदार चव्हाण, ऍड. पाटील-उंडाळकर उपस्थित होते. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्याच धर्तीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे एकच पॅनेल कृष्णा कारखान्यात स्थापन करून थेट लढा द्यावा, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. एकच पॅनेल स्थापन झाल्यास भाजप विरुद्धची लढत अधिक सोपी होईल, असेही मत अनेकांनी मांडले. बैठकीला नानासाहेब पाटील, शिवाजी मोहिते. शिवराज मोरे, नितीन पाटील, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, राजेंद्र चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, कार्यकर्ते उपस्थित होते.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT