Satara Latest Marathi News 
सातारा

दर्जेदार काम न झाल्यास माझ्याशी गाठ; खासदार उदयनराजेंचा ठेकेदारांना थेट इशारा

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विकासकामातील टक्केवारीवरून वादंग उठलेले असतानाच काल जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठेकेदारांची बैठक घेत त्यांना दर्जाबाबत सुनावले. दर्जेदार काम न झाल्यास गाठ माझ्याशी असून, टक्का मागणाऱ्यांना मी धक्का देईन, असा इशाराच त्यांनी नाव न घेता अनेकांना दिला. 

सातारा पालिकेच्या निवडणुकीचे पडघम विकासकामांच्या माध्यमातून वाजू लागले आहेत. साताऱ्यातील विकासकामांवर जोर देत त्यावर खासदार भोसले यांनी स्वत: लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरीच्या काळात विकासकामांच्या फाईल, त्यावरील सह्या आणि त्यातील टककेवारीच्या आरोपांवरून पालिकेत राजकीय खळबळ उडाली होती. याची दखल घेत काल जलमंदिर येथे खासदार उदयनराजेंनी पालिकेची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी काळात पालिकेच्या तसेच इतर निधीतून होणाऱ्या कामांवर चर्चा झाली, तसेच ठेकेदारांची मते जाणून घेण्यात आली. 

ठेकेदारांची मते जाणून घेतल्यानंतर खासदार उदयनराजेंनी कोणत्याही कामाच्या अनुषंगाने वाद उत्पन्न होणार नाहीत, अशा सूचना केल्या. पालिकेची सर्वच कामे दर्जेदार होणे आवश्‍यक असून, दर्जाशी केलेली कोणतीही तडजोड मी मान्य करणार नाही, अशी ताकीदही त्यांनी या वेळी ठेकेदारांना दिली. ताकीद देत असतानाच सुरू असणाऱ्या टक्केवारीच्या कुजबुजीचा कानोसा घेत त्यांनी कोणीही कामात टक्का मागितल्यास त्याची तक्रार माझ्याकडे करा, मी टक्का मागणाऱ्याला माझ्या स्टाईलने धक्का देतो, असेही सांगितले. 

ठेकेदारांकडून उकळली रक्कम
 
मध्यंतरीच्या काळात सातारा पालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने पालिकेची कामे करणाऱ्या ठेकेदारांना यथाशक्‍ती समर्पण निधी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार सुमारे दोन ते अडीच लाख रुपये त्या बड्या अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार अनेक ठेकेदारांनी एकाकडे जमा केले. ही रककम का आणि कशासाठी जमा केली होती, याची कोणतीही माहिती सध्या तरी पालिकेच्या ठेकेदारांकडे नाही. मात्र, या समर्पण निधी जमा करण्याच्या सूचना करणारी एक ऑडिओ क्‍लिप मात्र एकाने आपल्याकडे जपून ठेवली आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT