Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

माण तालुक्‍यात कोण ठरणार गावकारभारी?; 61 ग्रामपंचायतींचा फैसला होणार मंगळवारी!

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीसाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविल्या आहेत. 9 फेब्रुवारीला 33, तर 10 फेब्रुवारीला 28 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडी होणार आहेत. तहसीलदार बाई माने यांच्या आदेशानुसार या निवडीचा कार्यक्रम होणार आहे. 

माणमधील 14 बिनविरोध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर उर्वरित 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अतिशय चुरशीने पार पडल्या. निकालानंतर सत्तेबद्दल दावे-प्रतिदावे करण्यात आले. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर काही ठिकाणी "गड आला; पण सिंह गेला' अशी बहुमत मिळविलेल्या पॅनेलची अवस्था झाली. काही ठिकाणी सरपंचपद मिळविण्यासाठी घडलंय बिघडलंयची चर्चा सुरू आहे. आज सरपंच निवडीसाठीच्या विशेष सभांच्या तारखा तहसीलदार माने यांनी जाहीर केल्या. 

त्यानुसार 9 फेब्रुवारी रोजी पर्यंती, शिंगणापूर, मार्डी, बोडके, वडगाव, इंजबाव, वाकी, श्रीपालवण, शिंदी खुर्द, शेवरी, बोथे, थदाळे, पळसावडे, गोंदवले बुद्रुक, वडजल, सुरुपखानवाडी, गटेवाडी, राजवडी, हवालदारवाडी, हिंगणी, खडकी, काळचौंडी, टाकेवाडी, तोंडले, गंगोती, पिंगळी खुर्द, रांजणी, गोंदवले खुर्द, कुकुडवाड, किरकसाल, सोकासन, पुकळेवाडी व मोही या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी जांभूळणी, संभूखेड, शिंदी बुद्रुक, येळेवाडी, भालवडी, पिंपरी, वारुगड, कुळकजाई, जाशी, शिरवली, डंगिरेवाडी, देवापूर, धामणी, दिवडी, ढाकणी, हस्तनपूर, कारखेल, भाटकी, शेनवडी, भांडवली, मोगराळे, पानवण, पिंगळी बुद्रुक, वर म्हसवड, लोधवडे, वाघमोडेवाडी, राणंद व वळई या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी होणार आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

Konkan Rice Fields Damage : धीम्या पंचनाम्यांमुळेच बळीराजाच्या जखमेवर मीठ, कोकणात भात पिक बघायला म्हणून शिल्लक नाही

SCROLL FOR NEXT