Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पळपुट्या; सभापती स्मिता हुलवानांचे टीकास्त्र

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने वस्तुनिष्ठ अहवाल मागविला असताना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, अशी नोटीस आली असताना नगराध्यक्षा शिंदे नोटीस न आल्याचे खोट सांगून कऱ्हाडकरांची फसवणूक करत आहेत. नगराध्यक्षा शिंदे त्यांच्या कर्तव्यापासून नेहमीच पळ काढतात. त्यामुळे त्या पळपुट्या ठरल्या आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी नगराध्यक्षांना दिले आहे. 

अर्थसंकल्पाबाबत नगराध्यक्षा शिंदे यांना अभिप्राय देण्याची नोटीस आली आहे. त्या नोटिशीच्या प्रतीही हुलवान यांनी दिल्या. या नोटिशीचा खुलासा नगराध्यक्षा करत नाहीत, असे सांगून हुलवान म्हणाल्या, ""जिल्हा पालिका प्रशासकीय अधिकारी अभिजित बापट यांच्याकडे अर्थसंकल्प मंजुरीला गेला आहे. 

नगराध्यक्षा शिंदे यांनी अर्थसंकल्पाची सूचना एकमताने मंजूर झाली आहे. तो अर्थसंकल्प मंजूर करावा. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी सूचनेत बदल झालेली उपसूचना मंजूर झाली आहे. तो अर्थसंकल्प मंजूर करावा, असे कळवले आहे.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह निर्दोष; कोर्टाने काय म्हटलं?

Gold Rate Today: ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव घसरले! उच्चांकापासून 36 हजारांनी स्वस्त; आजचा ताजा भाव पाहा

Kolhapur Illegal Abortion Case : 300 गर्भपातांची कबुली अन् 'मुलगाच' होण्याचे औषध! डॉ. गायकवाडच्या काळ्या कारनाम्यांचा कोल्हापुरात भांडाफोड, 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती

Pune Miraj Railway:‘रेल्वे’चे कुंपण शेतकऱ्यांच्या मुळावर! कऱ्हाड तालुक्यातील ४५ गावांचे शेतरस्ते बंद; शेतकरी झाले आक्रमक

Latest Marathi News Live Update : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित

SCROLL FOR NEXT