Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

चितळीत निवडणूक एकतर्फी की घासून?; गुदगे-येळगावकर गटात कॉंटे की टक्कर

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : चितळी (ता. खटाव) ग्रामपंचायतीसाठी गुदगे व येळगावकर या पारंपरिक विरोधी गटांत सामना रंगला असून, विकासकामांच्या जोरावर गुदगे गटाचा एकतर्फी विजय होणार, की गेल्या पंचवार्षिकप्रमाणे निवडणूक घासून होणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. 

चितळी ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनेल यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रभाग तीनमध्ये सर्व तीनही जागा खुल्या असल्याने तेथे कॉंटे की टक्कर होणार आहे. हा प्रभाग खटाव पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती हिराचंद पवार व त्यांचे विरोधक ऍड. हणमंतराव जाधव यांचा असल्याने तो जिंकणे प्रतिष्ठेचे झाले आहे. दोन्ही गटांमार्फत प्रभागनिहाय बैठका, कोपरा सभा घेण्यात येत आहेत. घरोघरी गाठीभेटी घेतल्या जात आहेत. आवश्‍यक तेथे गुदगे आणि डॉ. येळगावकर यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन रुसवे-फुगवे काढले जात आहेत, काही आश्वासने दिली जात आहेत. 

उपसभापती हिराचंद पवार, निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक रामराव पवार, शंकरराव पवार, श्रीरंग फाळके, सचिन पाटील हे तेथील गुदगे गटाची धुरा सांभाळत आहेत, तर ऍड. हणमंतराव जाधव, प्रशांत पवार व त्यांचे सहकारी येळगावकर गटाची खिंड लढवत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन्ही गटांना 15 पैकी सात सात जागा मिळाल्या होत्या. तर एका जागेसाठी समान मते मिळाली होती. त्यावेळी चिठ्ठीपद्धतीनुसार गुदगे गटाचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीत केवळ बहुमत मिळणार, एकतर्फी होणार, की घासून, की टक्कर होणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT