Satara Pune Road esakal
सातारा

National Highway : Weekend चा प्लान करताय? मग, पुणे-बंगळुरु महामार्गावर 'अशी' आहे स्थिती!

कराडजवळ सहापदरीकरणाचं काम सुरू झालं असून कोल्हापूर नाक्यावरील पूल काही दिवसांपूर्वीच पाडण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

या एप्रिल महिन्यात बऱ्याच सुट्ट्या असल्यामुळं लोक Long Weekend चा प्लान बनवत आहेत. त्यामुळं या निमित्तानं पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

सातारा : कराडजवळ सहापदरीकरणाचं काम सुरू झालं असून कोल्हापूर नाक्यावरील पूल काही दिवसांपूर्वीच पाडण्यात आला. या कामामुळं कोल्हापूर, पुणे, सांगलीकडं होणारी वाहतूक विलंबानं सुरु आहे.

त्यातच आता शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं आज शुक्रवारपासूनच (ता. 7) रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत आहे.

शनिवार-रविवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं लोक फिरायला जायचा प्लान आखत आहेत, त्यामुळं पुढील दोन दिवस पुणे-बंगळुरु महामार्ग (Pune-Bangalore Highway) ठप्प होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातही सध्या महामार्गाचं काम जोरात सुरु असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प होताना दिसत आहे, त्यामुळं वाहनधारकांना ट्राफिक जामचा त्रास सहन करावा लागत आहे.

या एप्रिल महिन्यात बऱ्याच सुट्ट्या असल्यामुळं लोक Long Weekend चा प्लान बनवत आहेत. त्यामुळं या निमित्तानं पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. कारण, कर्नाटकात 10 मे रोजी मतदान असल्यामुळं आणि अचारसंहिता लागू झाल्यामुळं कोगनोळी टोलनाक्यावर तपासणी केली जात आहे. या प्रकारामुळं महाराष्ट्रातील वाहनधारक आपला कर्नाटकातील प्लान रद्द करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT