karad 
सातारा

पाऊस मदतीला; पण सोसाट्याच्या वाऱ्याने घात

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) ः सध्या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; पण या पावसाबरोबर सुसाट वारे असल्यामुळे ऊस, मका पिकांचे नुकसान झाले आहे. 

विश्रांती घेतलेल्या पावसाने उंडाळे, येळगाव, काले, ओंड आदी भागात पुन्हा सुरुवात केली. परिसरात पाऊस कमी पण जोरदार वाऱ्यामुळे ऊस, मका, पिके भुईसपाट होऊ लागली आहेत. खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे; पण शेतकऱ्यांची ऊस, मका ही पिके मात्र जमीनदोस्त होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पेरणी सरीवर टोकणी सरीवर प्रामुख्याने भुईमूग, सोयाबीन या पिकांची टोकण केली. या पिकांची उगवण चांगली झाली. जुलैमध्ये पावसाची उघडझाप सुरू असल्याने पिकाच्या अंतर्गत मशागतीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन-तीन दिवस पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. त्याचा चांगला फायदा खरीप हंगामातील पिकांना झाला; परंतु वादळी वाऱ्यामुळे आडसाली ऊस, सरीवर टोकलेले सोयाबीन, मका ही पिके मात्र भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणेकरांसाठी मोठा दिलासा! अवघ्या २४ तासांत धरणांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर; १८ दिवसांची तहान भागणार

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

Marathi Live Updates : नेरुळमध्ये झाड कोसळल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

मुंबईत पावसाच्या पाण्यात करंटचा धक्का, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; तुम्ही कशी काळजी घ्याल? घराबाहेर पडण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT