Ramraje Naik Nimbalkar 
सातारा

घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; रामराजेंचा 'आमचं ठरलंय' ला सल्ला

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माण तालुक्यातील अपप्रवृत्ती घालविण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहणे आवश्यक आहे, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केली. (satara-ramraje-naik-nimbalkar-jaykumar-gore-political-news)

येथे 'आमचं ठरलंय'च्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील पोळ, बबनराव वीरकर, विष्णूपंत अवघडे, युवराज सूर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, कविता म्हेत्रे, जालिंदर खरात, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब दोरगे, दादासाहेब मडके, बाबासाहेब माने, पिंटू जगदाळे, रफिक मुलाणी, बाळासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, दौलतराव जाधव व विविध गावचे सरपंच, सदस्य, सोसायटी सदस्य उपस्थित होते.

श्री. निंबाळकर म्हणाले,‘‘ कोणत्याही निवडणुकीत यश अपयशापेक्षा एकत्र राहणे आवश्यक असते. तुमचे जे 'आमचं ठरलंय' आहे, हे पाच वर्षांसाठी ठरायला हवे होते. तुम्ही सर्वजण घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वांना मान्य होईल अन्‌ जो योग्य असेल, असा निर्णय आपण घेऊ.’’

रणजित देशमुख म्हणाले,‘‘ काँग्रेस पक्ष हा आमचं ठरलंयसोबत ताकदीने राहणार आहे. आम्ही सर्वजण एकदिलाने एकत्र आहोत. बाजार समितीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची आम्ही तयारी केली आहे. मी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात असून, त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली आहे.’’

श्री. देसाई , डॉ. पोळ यांचीही भाषणे झाली. सुभाष नरळे यांनी प्रास्ताविक केले. शिवाजीराव यादव यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT