कचरा प्रकल्‍प
कचरा प्रकल्‍प 
सातारा

कर्‍हाड पालिका ठरणार आयडॉल : अंड्याच्या कवचापासून करणार पावडर

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड पालिकेने वेस्ट टू वेल्थचा नारा देत एक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्या माध्यमातून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होणार आहेत. त्यासाठी मोठे शेड उभारण्यात येत आहे. तेथे पालिका टिकाऊपासून कोणत्या टिकाऊ वस्तू तयार करणार आहे. टिकाऊ वस्तूंचे संशोधन कसे होणार आहे. त्याचे प्रशिक्षण, निर्मिती आणि प्रदर्शन भरवले जाणार आहे. त्याद्वारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेणारी कऱ्हाड ही जिल्ह्यातील पहिली पालिका ठरणार आहे. 

पालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पात नारळाच्या कवचापासून कार्बन तयार केला जाणार आहे. अंड्याच्या कवचापासून पावडर, टाकाऊ प्लॅस्टिकपासून सुशोभित वस्तू, फेकलेल्या भाज्यांपासून जनावरांना खाद्य, फळांच्या साली आणि बियांपासून बियाणांची बॅंक, मांस, मासे यापासून जनावरांचे खाद्य, गार्डन वेस्ट पासून माती प्रक्रिया, विविध प्रकारचे प्लॅस्टिक वितळवून दररोजच्या वापरातल्या वस्तू तयार करण्याचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. 

पालिकेने हाती घेतलेला वेस्ट टू वेल्थ उपक्रमासाठी 600 चौरस मीटरचे तिसरे शेड दिले आहे. त्यात सुक्‍या कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात येणार आहेत. शेडमध्ये त्या पद्धतीने बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्याच्या निर्मितीचे प्रशिक्षण संस्थांना दिले जाणार आहे. टाकाऊ वस्तू पूर्णपणे वेगवेगळया जमा करून त्याची पुन्हा विक्री केली जाणार आहे. त्यातून पालिकेस उत्पन्न मिळणार आहे. तेथील कामेही प्रगतीपथावर आहेत. 

थीम पार्क पालिकेचे खास वैशिष्ठ्ये ठरावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशात पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर पालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीस प्राधान्य दिले. पहिली दोन शेड त्यासाठी उभारली. तिसऱ्या शेडमध्ये वेस्ट टू वेल्थचा उपक्रम हाती घेतला आहे. सुक्‍या कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती होणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्था, कचरा वेचक, भंगार व्यावसायिकांच्या अर्थार्जनाला चालना देण्यात येणार आहे. 

बारा डबरे येथे डीपीआर अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन मंजूर आहे. तेथे थीम पार्क साकारत आहे. 300 मेट्रीक टन क्षमतेच्या ओला कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र तेथे असून, 50 मेट्रीक टन क्षमतेचे सुक्‍या कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र उभारले आहे. त्यासाठी 900 व 300 चौरस मीटरची दोन शेड उभारली आहेत. तिसरे शेड कचरा संशोधन उपक्रमासाठी आहे. 

""कऱ्हाड पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातंर्गंत बारा डबरे येथे थीम पार्कची निर्मिती केली आहे. तेथे ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. वेस्ट टू वेल्थ धोरण राबवत त्या शेडमध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे संशोधनासह प्रदर्शन, निर्मिती आणि प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'' 
- यशवंत डांगे, 
मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT