Satara 
सातारा

कोरेगाव गौरी गणपती सजावट स्पर्धेस चांगला प्रतिसाद, अंकिता बर्गे ठरल्या विजेत्या

पांडुरंग बर्गे

कोरेगाव (जि. सातारा) : येथील रोटरी क्‍लबच्या वतीने झालेल्या "कोरेगाव 2020-2021 गौरी गणपती सजावट' स्पर्धेस चांगला प्रतिसाद लाभला. बहुतांश स्पर्धकांनी पर्यावरणपूरक गौरी गणपती सजावट करून पर्यावरण संतुलन राखण्यात योगदान दिले. कोरेगाव शहर मर्यादित झालेल्या या स्पर्धेत 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला. अंकिता प्रदीप बर्गे (रा. आरफळ कॉलनी) यांनी सादर केलेल्या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळवला. 

कोरेगाव रोटरी क्‍लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. या उपक्रमांना चांगला प्रतिसादही मिळतो. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवात गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्याबाबत संभ्रमावस्था असताना रोटरी क्‍लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी या स्पर्धा कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून आयोजित करायला काय हरकत आहे? आपण त्यातून प्रबोधनच करणार आहोत ना? मग स्पर्धा घ्यायला काय हरकत आहे, असा विचार पुढे आल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला. त्यात स्पर्धकांकडून केवळ व्हॉट्‌सऍपवर छायाचित्रे मागवून त्यांचे परीक्षण रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी करून विजेत्यांची नावे निश्‍चित करून नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले. 

स्पर्धेमध्ये श्वेता राजेंद्र जाधव (शांतीनगर) यांनी द्वितीय, धनंजय सयाजीराव बर्गे (जुनी पेठ) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेमध्ये श्रुती दीपक बर्गे (हुतात्मा स्मारक), विद्युल्लता संदीप चव्हाण (प्रोफेसर कॉलनी), मनीषा राजेंद्र बर्गे (अजिंक्‍यनगर) व मेघेश्‍वरी राहुल घाडगे (ल्हासुर्णे फाटा) यांनी उत्तेजनार्थ अनुक्रमे चार क्रमांक मिळवले. विजेत्यांना रोटरी क्‍लबचे अध्यक्ष नीलेश भंडारे, सचिव विनायक बर्गे, दिलीप वेलीयावेट्टिल, पंकज भोसले, प्रभाकर बर्गे, रामभाऊ घाडगे आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT