सातारा

पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि.सातारा) : काही गावं ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीण्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. अशाच पद्धतीने कृष्णाकाठचे रेठरे बुद्रुक जवळजवळ पाच दशकांपासून "रेठरा बासुमती' तांदळाची ख्याती पांघरून राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जात आहे. गावच्या शिवारातील मातीचा गुणधर्म हा उत्तम दर्जा व सुवासिक तांदूळ उत्पादनासाठी उपयुक्त ठरत असल्याने "रेठरा बासुमती' तांदळाचा ब्रॅंडच तयार झाला आहे. रेठऱ्यात पिकणाऱ्या या सुवासिक तांदळाची ख्याती आता देशाबाहेर पोचली आहे.
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?
 
पश्‍चिम महाराष्ट्राची जीवनदायनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रुक वसले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तत्कालीन नेत्यांनी सहकारी चळवळीचा पाया घातला. या पायातील येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना हा एक दगड. माजी मंत्री (कै.) यशवंतराव मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली रेठऱ्याला कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारला. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1961 मध्ये झाला. तेव्हापासून आजतागायत कृष्णा साखर कारखाना या भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला आहे. कारखान्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचे तोंड गोड केले आणि चार सुखाचे दिवसही दाखवले. यामुळेच या भागाला साखरपट्टा किंवा ऊसपट्टा असंही म्हंटल जातं.

‘सरफेसी कायदा आहे तरी काय?  

त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्यांसाठी रानभाज्या ठरताहेत पर्वणी

याच साखरपट्ट्यातील रेठऱ्यात ऊस सोडून बासुमती भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीदेखील झाला. या गावाला तीन बाजूंनी कृष्णा नदीने वेढले आहे. त्यामुळे पाण्याची जराही कमतरता नाही. जवळपास 3 हजार एकर काळी सुपीक जमीन गावात नगदी पिकायोग्य आहे. 
गावातच कारखाना असल्यामुळे पूर्वी रेठऱ्यात प्रत्येक शेतकरी ऊस लागवड करायचा. बागायती शेतीत रिस्क कमी व परतावा मिळण्याची जास्त शक्‍यता असल्यामुळे उसाकडेच अनेकांचा भर असायचा. गावच्या शिवारात स्वातंत्र्यापूर्व काळात काही देशी वाणाचे भातपीक घेतले जात. कृष्णा कारखाना उभा राहिल्यापासून नजर जाईल तिथे ऊस पीक दिसू लागले.

चीनमधील आयात बंदीनंतर कोरेगावचा राजमा देशात खाणार भाव

साधारण सत्तरच्या दशकात येथील कृषिमहर्षी (कै.) आबासाहेब मोहिते यांनी हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथून बासुमती तांदळाचे 370 वाणाचे बियाणे आणले व आपल्या शेतात पेरले. त्यानंतर बासुमती तांदूळ रेठऱ्याच्या मातीत रुजू झाला. या पिकाच्या सुवासाने परिसर बहरून गेला आणि मोहितेंच्या शेतातील बासुमती तांदळाचे पीक पाहण्यास आसपासचे शेतकरी येऊ लागले. आबासाहेबांचा प्रयोग यशस्वी ठरला आणि पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली.
 
हळूहळू गावात बासुमती भात पिकू लागला. आसपासच्या गावांतही या वाणाची बीजे पसरली. काही काळानंतर वडगाव मावळ येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातून इंद्रायणी तांदळाचे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बियाणे आणले. बासुमतीपेक्षा जास्त उत्पन्न निघत असल्यामुळे या तांदळालादेखील प्रचंड मागणी होऊ लागली.
 
आजमितीला दर्जेदार व सुवासिक रेठरा बासुमती व इंद्रायणी तांदूळ येथील शिवारात मातीतील विशिष्ट गुणधर्म व गावास तिन्ही बाजूने वाहणाऱ्या नदीतील पाण्याच्या आर्द्रतेमुळे पिकतो. खरंतर तांदूळ हे समुद्रकिनारपट्टीच्या भागातील पीक मानले जाते. महाराष्ट्रात कोकणात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शास्त्रज्ञांच्या मते रेठरेच्या तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्यातील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी उपयुक्त आर्द्रता शिवारात सर्वत्र निर्माण होते. याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो. रेठरे गावात प्रवेश केला, की घराघरांतून या तांदळांचा खास वास नक्की अनुभवता येतो.

तुम्ही "स्टिंग ऑपरेशन'करता काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  त्यावर आपण त्यांना कृपया "स्टिंग ऑपरेशन'ची भाषा करू नका, असे ठणकावून सांगितले......  

सातारा, सांगली, कोल्हापूरच नाही तर पुण्या-मुंबईलादेखील दुकानाबाहेर रेठरा तांदूळ मिळेल, अशी जाहिरात दिसते. रेठरेमधील तांदळाच्या यशामुळे कऱ्हाड तालुक्‍यात अनेक गावांत इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेतले जाते. इथला तांदूळ फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अटकेपार दुबईपर्यंत जाऊन पोचला आहे.
संपादन - सिद्धार्थ लाटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT