jawali 
सातारा

आखाडेवस्तीचा रस्ता झाला बंद

सकाळ वृत्तसेवा

कास (जि. सातारा) ः कास पठाराच्या पश्‍चिमेला असलेल्या कुसुंबीमुरा या गावांतर्गत असलेल्या आखाडेवस्तीकडे जाणारा रस्ता दगडाची ताल व काटेरी झाडेझुडपे टाकून बंद केल्याने या दुर्गम वस्तीतील नागरिकांची गैरसोय होत आहे. हा रस्ता खुला करण्यासाठी स्थानिकांनी तहसीलदार शरद पाटील यांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, कुसुंबीमुरातील आखाडेवस्तीत 2011 साली आमदार फंडातून मोळेश्वर ते सह्याद्रीनगर या मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटरचा रस्ता झाला आहे. हा रस्ता सध्या कच्च्या स्वरूपात असून त्यावरून आखाडेवस्तीतील लोकांची व शालेय विद्यार्थ्यांची रोज ये-जा असते. रस्त्याच्या मध्यभागी दगडी ताल व काटेरी झाडे, फांद्या लावून सहा जूनपासून तो बंद केला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने या मार्गाशिवाय लोकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना डोंगरावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. हा रस्ता व पायवाट खुली करून मिळावी, अशी मागणी स्थानिकांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT