khatav 
सातारा

रस्ता चकाचक; फरशी पूल मोजताहेत शेवटच्या घटका

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : अनेक दुर्गम गावांसह भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यालाही जोडणाऱ्या ढेबेवाडी-महिंद रस्त्याच्या डांबरीकरणासाठी शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी या मार्गावर सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधलेले अनेक लहान-मोठे पूल सध्या शेवटची घटका मोजत असल्याने त्यांच्यावरही शासनाची कृपादृष्टी व्हावी, अशी मागणी होत आहे. 

ढेबेवाडी ते महिंद-सळवे हा रस्ता भविष्यात सातारा व सांगली जिल्हे जोडणारा नवीन मार्ग होऊ शकत असल्याने ढेबेवाडी खोऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने तो खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अलीकडे रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहनचालक, प्रवासी व पादचारी वैतागले होते. बनपुरीपासून पुढे अक्षरशः कसरत करतच ये-जा करावी लागत होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तत्काळ हालचाली करून रस्त्याच्या कामासाठी आर्थिक तरतूद करून घेतली. त्यातून रस्त्याचे बीबीएम, कारपेट, सिलकोट व बाजूच्या गटारांची कामे करून रस्ता चकाचक झाला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या लहान-मोठे फरशी पूल व महिंदजवळचा वांग नदीवरील जुन्या पुलाचे काय? हा प्रश्न कायमच राहिलेला आहे. 

महिंद मार्गावर ढेबेवाडी, जानुगडेवाडी, भालेकरवाडी, सणबूर या गावांच्या जवळ सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधलेले अनेक लहान-मोठे पूल सध्या शेवटची घटका मोजत असल्याने ते कोसळण्यापूर्वी ते दुरुस्त व्हावेत, त्याशिवाय ठिकठिकाच्या संरक्षक भिंती, बांधीव गटारे आदींचा प्रश्नही मार्गी लागावा, अशी अपेक्षा जनतेतून जोर धरू लागली आहे. 

सणबूरजवळ पूल कोसळण्याची भीती 
या मार्गावरील दगड व सिमेंटमध्ये बांधलेले अनेक पूल कोसळण्याच्या स्थितीत आहेत. सणबूर येथील पुलाच्या स्लॅबमधील सळ्या बाहेर आल्या असून भिंतीत झाडेही उगवली आहेत. या पुलावरील वाहतूक व त्याची उपयुक्तता याचा विचार करून तातडीने बांधकामासाठी पावले न उचलल्यास दुर्घटनेची भीती आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT