sakal
सातारा

सातारा: आयडीबीआय बँकेस साडेचार लाखांचा गंडा; एकावर गुन्‍हा

दुचाकी वितरक बोलत असल्‍याचे सांगत ईमेलद्वारे आरटीजीएस रिक्‍वेस्‍ट पाठवत सातारा येथील आयडीबीआय बँकेस ४ लाख ६० हजारांना गंडा घातल्‍यात आला

गिरीश चव्हाण

सातारा : दुचाकी वितरक बोलत असल्‍याचे सांगत ईमेलद्वारे आरटीजीएस रिक्‍वेस्‍ट पाठवत सातारा येथील आयडीबीआय बँकेस ४ लाख ६० हजारांना गंडा घातल्‍याप्रकरणी एका मोबाईल क्रमांक धारकावर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याची तक्रार बँकेच्‍या वतीने अजित मोहन धायगुडे (रा. अहिरे, ता. खंडाळा) यांनी नोंदवली आहे.

अजित धायगुडे हे पोवई नाका येथील आयडीबीआय बँकेत कार्यरत असून, ता. २९ रोजी दुपारी एकाने त्‍यांच्‍याशी संपर्क साधत आपण साताऱ्यातील प्रसिद्ध दुचाकी वितरक असल्‍याचे भासवत संभाषण केले. हे करतानाच त्‍या अज्ञाताने दोन आरटीजीएस पाठवायचे असल्‍याचे सांगितले. याच वेळी त्‍या अज्ञाताने दुचाकी वितरकाच्‍या नावाशी सा‍धर्म्य असणाऱ्या मेलवरून आरटीजीएस करण्‍यासाठीची रिक्‍वेस्‍ट पाठवली. यात पंजाब नॅशनल बँकेतील मैसर रझा यांच्‍या खात्‍यात ९ लाख ९० हजार, तसेच ॲक्सिस बँकेच्‍या चरणजित सिंग यांच्‍या खात्‍यात ८ लाख १४ हजार पाठविण्‍यास सांगितले.

बँकेने त्‍याबाबतची खात्री करून आरटीजीएस रिक्‍वेस्‍टनुसार १८ लाख १५ हजार ६०० रुपये दोन्‍ही बँकेतील खात्‍यात वर्ग केली. दैनंदिन कामकाजादरम्‍यान संशय आल्‍याने बँकेने शहानिशा केली. या वेळी त्‍यांच्‍या संबंधित दुचाकी वितरकाने अशी कोणतीही आरटीजीएस रिक्‍वेस्‍ट पाठविल्‍याचे लक्षात आले. यानंतर आयडीबीआय बँकेने संबंधित बँकांशी संपर्क साधत दोन्‍ही बँक खात्‍यातील रोकड गोठविण्‍याच्‍या सूचना केल्‍या. रोकड गोठविण्‍याची प्रक्रिया होईपर्यंत संबंधितांनी त्‍यातील ४ लाख ६० हजारांची रोकड काढून घेतली होती. खोटी आरटीजीएस रिक्‍वेस्‍ट पाठवत बँकेची फसवणूक केल्‍याप्रकरणी एका मोबाईल क्रमांक धारकावर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात काल गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. याचा तपास वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT