येसूबाईंची समाधी  sakal
सातारा

Satara : संगम माहुलीत येसूबाईंची समाधी सापडल्याचा दावा; जुन्या कागदपत्रांद्वारे शोध

सुहास राजेशिर्के, नीलेश पंडित यांचा दावा ; जुन्या कागदपत्रांद्वारे शोध

सकाळ वृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची संगम माहुली येथील समाधीची मूळ जागा सापडली आहे. येथील हरिनारायण मठाच्या इसवी सन १७५६ मधील ऐतिहासिक कागदपत्रांवरून हा शोध लागला आहे.

माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व जिज्ञासा मंचतर्फे झालेल्या सखोल संशोधनातून या संदर्भातील मूळ दस्तऐवज सापडले आहेत. या शोधामुळे समाधी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला गती मिळणार आहे, असा दावा येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे नीलेश पंडित यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

नीलेश पंडित म्हणाले, की संगम माहुली गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथरा आहे. या चौथाऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचा सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ मध्ये झाला. या समाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे.

या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. हे दगडी बांधकाम म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे समाधी स्थळ आहे. ही समाधी स्थळ वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे. या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित अशी राजचिन्हे कोरण्यात आली आहेत.

या समाधीचा शोध ज्या इनामपत्राच्या आधारावर घेतला गेला. ती येथील हरिनारायण मठाच्या दस्तऐवजामध्ये मिळून आले आहेत. यामध्ये पाच नोव्हेंबर १७५६ रोजी लिहिलेले पत्र असून, याची सुरुवात श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब या नावाने होते. १५ डिसेंबर १७४९ मध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले.

पत्रातील श्रीमंत मातोश्री आईसाहेब ही व्यक्ती म्हणजे ताराबाई राणीच होय. पत्रातील मजकुरानुसार वनमाळी बिनकमनं माळी यांनी शाहूनगर किल्ले सातारा म्हणजे सध्याचा अजिंक्यतारा येथे जाऊन ताराबाई राणीसाहेबांना विनंती केली, की हरिनारायण देवाची स्थापना कैलासवासी छत्रपती राजश्री शाहू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT