onion 
सातारा

बेभरवशाच्या कांद्याने केले मालामाल! २२०० रुपयांचा खाताेय भाव

राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) : नेहमीच बेभरवशाच्या ठरणाऱ्या कांद्याने लॅाकडाउनच्या साडेसातीत यावेळी मात्र येथील बळीराजाला मालामाल केले. दौंडेवाडी (ता. खटाव) येथील सुरेश गायकवाड या प्रयोगशील शेतकऱ्याच्या खिशात चक्क मंदीच्या काळात लाखो रुपयांचे उत्पन्न कांदा पिकाने आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत केवळ एका एकरात व साडेतीन महिन्यांत २४ टन कांद्याचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. (satara-success-story-farmer-gets-best-rates-onion-khatav)

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘मंदीच्या काळात अगदी १०० ते २०० रुपयानेदेखील कांदा विक्रीची वेळ आल्याने भांडवलही निघाले नाही; परंतु अशाही परिस्थितीत कांद्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही वा जिद्दही सोडली नाही. उन्हाळा कांद्याचे सरतेशेवटी भाव घसरले होते; पण बाजारपेठेचा अंदाज घेत कांदा चाळीत ठेवला. आता कांद्याला २२०० रुपयांचा भाव मिळाल्याने पदरी चांगले पैसे पडले.

हवामान बदलानुसार खत, औषध फवारणी व्यवस्थापन केल्याने कांदा व्यवस्थित बळावला. त्याचबरोबर ठिबकचा वापर केल्याने दुष्काळी भागातही कमी पाण्यावर यश मिळाले.’’ श्री. गायकवाड यांचा मुलगा प्रशांत हा उच्चविद्याविभूषित असून, त्यालाही शेतीची आवड आहे. प्रशांतचेही या यशात तेवढेच योगदान आहे.

काहीबाबतीत वडील प्रशांतच्या मताला वाव देऊन त्याचा शेतीतला उत्साह द्विगुणित करतात. प्रशांतला नोकरी करण्यापेक्षा शेती कसण्यात जास्त आवड आहे. ‘ज्याच्याकडे वावर आहे, त्याच्याकडे पॅावर आहे, असेही तो अभिमानाने सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: मुंबईत बेस्ट बसने दोघांना चिरडले, घटनेने खळबळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT