patan 
सातारा

पाटील आवाडमधील युवकांची अशीही पाटीलकी

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) ः मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीच्या कक्षेतील पाटील आवाड येथील युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी लॉकडाउनच्या काळात गावातील सार्वजनिक ठिकाणांची श्रमदानाने साफसफाई करत आपला मोकळा वेळ सत्कारणी लावला. 

जिल्ह्यात नुकत्याच केलेल्या पाच दिवसांच्या कडक लॉकडाउनच्या कालावधीतील मोकळा वेळ इतरत्र फिरण्यात आणि मोबाईलमध्ये चॅटिंग व गेम खेळण्यात वाया न घालवता तो श्रमदानाद्वारे सत्कारणी लावण्याचा निर्णय पाटील आवाडातील युवकांनी घेतला. श्रमदानातून गावात काय करता येईल याचे नियोजन करत तत्काळ त्याबाबत अंमलबजावणीही केली. तेथील श्री दत्त गजानन तरुण मंडळातील आबालवृद्ध सभासद, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आवश्‍यक ती खबरदारी घेत उत्स्फूर्तपणे श्रमदानात सहभाग घेतला. सर्वांच्या सहभागातून श्री दत्त मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गावातील रस्ते, गटारे व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. शाळेच्या परिसरात कॉंक्रिटीकरण करण्यात आले. दोन दिवस सुरू असलेल्या या मोहिमेद्वारे गाव परिसर चकाचक झाला आहे. 

लवकरच स्मशानभूमी व प्राथमिक शाळेच्या परिसरात आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणार असल्याचेही या युवकांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत, तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यात सहभागी सर्वांचे अभिनंदन केले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Mumbai : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत शिरला बिबट्या, पाळीव कुत्र्यावर केला हल्ला; सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

कार्यकर्त्यांचे ऐकून सर्व प्रयोग झाले, कुठेच 'स्कोप' नाही, आता भाजपमध्ये आलो; समरजीत घाटगेंची घरवापसी

Iran-US ceasefire : पैसाच पैसा! होर्मुझमधून करणार कमाई, युद्धविरामानंतर ट्रम्प यांचं विधान; इराणचा भडका उडणार

Ganeshmurti : गणेशमूर्तींनाही युद्धाचा फटका; अमेरिकावारीसाठी सज्ज गणेशमूर्ती अडकल्या

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

SCROLL FOR NEXT