Satara Take Care On The Highway... 
सातारा

महामार्गावर जाताना घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा

सायगाव (जि. सातारा) : येथील महामार्गाच्या सहापदरीकरणातील कामात अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. त्या आता चव्हाट्यावर येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अपघात घडून प्रवासी, वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात हा सेवा रस्ता लिंब फाटा ते उडतरे या मार्गात ठिकठिकाणी खचला होता. तर अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर देखील मोठमोठी भगदाडे पडून धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, संबंधित कंपनीने तात्पुरती डागडुजी करून केवळ वेळ मारून नेण्याचे काम आजपर्यंत केले आहे. 

महामार्गावरून आनेवाडी गावात प्रवेश करतानाच्या सेवा रस्त्यावर हे भगदाड पडले असून, गेली पंधरा दिवस ते तसेच आहे. परंतु, संबंधित कंपनीच्या नजरेस ते आले नसल्याचे दिसत आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यावर त्याकडे लक्ष देणार काय? असा सवाल वाहतूकदार व प्रवासी वर्गाकडून होत आहे. 
रस्ता खचल्यासंदर्भात आम्ही संबंधित कंपनीकडे माहिती दिली. परंतु, अद्याप कंपनीचा कोणीही अधिकारी वा साधा कर्मचारीही पाहावयास आला नसून, त्यांनी लवकर लक्ष न दिल्यास आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा आनेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर फरांदे यांनी दिला आहे. 

सेवा रस्त्यावर अतिक्रमण 
सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठे अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. शेती अवजारे, वाहनेही सेवा रस्त्यातच उभी असल्यामुळे 20 फुटांचा रस्ता 10 फुटांचाच उरला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा गंभीर अपघात घडले आहेत. तरी देखील त्या अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर संबंधित कंपनीने कोणत्याही प्रकारे कार्यवाई केलेली नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?

Young Farmer Death: सकाळी चहाचे हॉटेल, दुपारी शेतात काम; २२ वर्षीय संतोष राऊतच्या मृत्यूने सिसारखेडा हळहळले

Latest Marathi News Live Update : दुष्काळामुळे सरकारी खर्चात २० टक्के कपातीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; 'लाडकी बहीण' योजनेला मात्र धक्का नाही

Kanya Puja Importance: अष्टमीला कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पूजेची परंपरा

SCROLL FOR NEXT