Satara news esakal
सातारा

Satara : स्मशानभूमीतील ‘लक्ष्मी’ची पावले आता शाळेत...

गटशिक्षणाधिकाऱ्यांसह जागरूक शिक्षकांची तत्परता; तिच्यासाठी उघडली शिक्षणाची कवाडे

सकाळ डिजिटल टीम

वडूज : स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेले लोक परत जात असताना प्रवेशद्वारात एखादा टॉवेल अंथरूण ती त्यांच्याकडून दान पदरात पाडून घ्‍यायची. स्मशानभूमीत अन्य कोणी वास्तव्यासही नसल्याने येथे असलेली फळा, फुलांची झाडेच तिचे मित्र-मैत्रिणी. या झाडांच्या सोबतीनेच ती एकटी अभ्यासाचे धडे गिरवायची. तिची हीच तळमळ एका अंत्यविधीसाठी आलेल्या काही शिक्षकांच्‍या नजरेत भरली. त्यांनी तत्काळ गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, तिच्‍यासाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली अन्‌ स्मशानभूमीतील ‘लक्ष्मी’ची पावले थेट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोचली.

लक्ष्मी शंकर गंधम असं तिचं नाव. तिचे वडील मूळचे पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील भटक्या जाती- जमातीमधील. नगरपंचायतीच्या वतीने येथील स्मशानभूमीत ते स्मशानजोगी म्हणून दोन महिन्यांपासून काम पाहत आहेत. त्याठिकाणी ते मुलगा हणमंत, स्नूषा दिव्याक्षया, मुलगी लक्ष्मी (वय सात) यांच्‍यासमवेत एका लहानशा खोलीत राहतात. स्मशानभूमीतील स्वच्छता ठेवणे, झाडांना पाणी देऊन त्यांची निगा राखणे, अंत्यविधीवेळी दहनकुंडात सरण रचणे, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना मदत करणे, अशा स्वरूपाची कामे ते करतात. अंत्यविधी झाल्यानंतर लक्ष्मी लहानसा टॉवेल टाकून प्रवेशद्वाराजवळ बसते. त्यावेळी

अंत्यविधीसाठी आलेले लोक तिला आर्थिक मदत करतात. हेच तिचे व तिच्‍या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन आणि अशीच दिनचर्या. एका रक्षाविसर्जन विधीसाठी शहर परिसरातील लोक स्मशानभूमीत गेले होते. शोकाकूल परिस्थितीमुळे तिथे सहाजिकच शांतता होती. अशा स्मशान शांततेत एक चिमुरडी मात्र हातात पुस्तक घेऊन वाचन करीत असताना सर्वांना दिसली.

त्‍यावेळी श्री. गोडसे, श्री. पवार, श्री. जगदाळे यांनी लक्ष्मीची शिक्षणाप्रती असलेली तळमळ पाहून तातडीने खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. श्रीमती भराडे यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांसह स्मशानभूमीत भेट देऊन लक्ष्मीची माहिती घेतली. त्‍यानंतर तिला येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक

दोनमध्ये दुसरीत प्रवेश देण्याबाबत कार्यवाही केली. मुख्याध्यापिका रेखा देशमुख, शिक्षिका सुनीता पवार, नीला देवकर, उमेश पाटील, शिवाजी खाडे, नंदराज हाडस यांनी तिला गणवेश, पाठ्यपुस्तके आदी शालेय साहित्य दिले. शाळेतील विद्यार्थ्यांनीही लक्ष्मीला फुले देऊन तिचे स्वागत केले.

...पण मला शाळेत शिकायचे आहे

सेवानिवृत्त प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी सुरेश गोडसे, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य राजेंद्र पवार, हुतात्मा परशुराम विद्यालयातील क्रीडा शिक्षक राजेंद्र जगदाळे यांच्‍या नजरेत ती बाब भरली. त्यावेळी त्यांनी त्या मुलीची भेट घेऊन अधिक चौकशी केली असता, तिने आम्ही पाथर्डीवरून आलो आहोत, आमची इथे ओळख नाही; पण मला शाळेत जायचे आहे, शिकायचे आहे, अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली. त्‍यानंतर संबंधितांनीही तिच्‍या या इच्छापूर्तीसाठी प्रयत्‍न केले. स्मशानभूमीत राहणाऱ्या निरागस लक्ष्मीची शिक्षणाप्रती असलेली ओढ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले, तर तिच्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍याबद्दल संबंधितांचेही अभिनंदन केले.

शालाबाह्य मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत. लक्ष्मीचे कुटुंब भटक्या जाती- जमातीमधील असून, त्‍यांनी एका जागी स्थिरावून लक्ष्मीचे शिक्षण पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. लक्ष्मीचीही शिक्षणाबद्दलची मोठी तळमळ दिसून आली. मुली शिकल्या पाहिजेत, स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्‍या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लक्ष्मीचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची मदत आवश्यक आहे.

- प्रतिभा भराडे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खटाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT