सातारा

गुंजभर सोन्यासाठी "त्यांचा' भावनांशी खेळ

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड, (जि.सातारा)  ः चोरी करणारा कशाची चोरी करेल, याचा नेम नाही. अवघ्या काही ग्रॅमच्या सोन्यासाठी येथील स्मशानभूमीतील जळून खाक झालेल्या मृतदेहाच्या रक्षा चोरीचा प्रकार उघडीस आला आहे. मृत महिलेच्या अत्यंसंस्कारावेळी तिच्या तोंडात सोन्याचा मनी ठेवण्याची प्रथा आहे. त्या सोन्याच्या मनीबरोबरच मृतदेहाला अग्नी दिला जातो. मात्र, ते सोने जळत नसल्याने ते आपल्याला मिळेल, या आमिषापोटी अवघ्या काही ग्रॅमच्या सोन्यासाठी संबंधित मृतदेहाची रक्षा चोरीचा अजब फंडा येथे चोरट्यांनी अवलंबला आहे. स्माशानभूमीत सुरक्षा रक्षक नसल्याने रक्षेची चोरी होत आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळण्याचा घृणास्पद प्रकार होत आहे.
 
शहरासह मलकापूर, ओगलेवाडी येथील अनेक जणांचे मृतदेह येथील स्मशानभूमीत येतात. त्यासाठी पोलिकेने येथे सोय केली आहे. तब्बल दहा लोखंडी पिंजऱ्याचे कठडे त्यासाठी पालिकेने बांधले आहे. आणखीही नवी स्मशानशेड उभी केली जात आहे. शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन त्याची सुविधा केली जात आहे. शहराला स्मशानभूमी मोठी आहे. काही तांत्रिक कारणामुळे महिनाभरापासून येथे सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे स्मशानभूमीत कोणीही येत असल्याचा प्रकार उघडकीस येतो आहे. सध्या तेथे सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक नागरिकांची विनाकारण त्या परिसरात ये- जा सुरू असेत. येथे असलेल्या सुरक्षा रक्षकाची निविदा पालिकेने रद्द केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिनाभरापासून स्मशानभूमी विना सुरक्षा रक्षकाची आहे. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन वेगळ्याच चोरीचा फंडा अवलंबला आहे.
 
येथील स्मशानभूमीत दहनासाठी महिलेचा मृतदेह आणल्यानंतर त्या मृत महिलेच्या तोंडात सोन्याचा मनी ठेवला जातो. तो सोन्याचा मनी ठेवण्याची हिंदू धर्माची प्रथा आहे. त्याशिवाय अग्नी दिला जात नाही. संबंधित महिलेला त्या सोन्याच्या मनीसह अग्नी दिला जातो. काही चोरटे अशा घटनांच्या मागावर आहेत. कोणत्या वेळी कोणाचा मृतदेह अग्नी संस्कारासाठी आला आहे, याची माहिती ते ठेवत आहेत. महिलेचा मृतदेह असल्यास ते चोरटे तेथे वॉच ठेवतात. रात्री अंधार पडला, की नदीकडेच्या बाजूने स्मशानभूमीत शिरतात. संबंधित महिलेला दहन दिल्याची जागाही त्यांना माहीत असते. तेथे जाऊन अग्नी दिलेल्या महिलेची रक्षा पोत्यात भरतात. कोणाच्या काही लक्षात येण्याआधीच तेथून ते पसार होतात. अशा तीन वेगवेगळ्या घटना येथे उघडकीस आल्या आहेत. संबंधित मृत महिलेच्या नातेवाईकांना रक्षा विसर्जनासाठी काहीच हाती लागले नव्हते. त्यांनी पालिकेत त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. अवघ्या काही ग्रॅमच्या सोन्याच्या मनीसाठी चोरी करून नागरिकांच्या भावानांशी खेळणाऱ्या चोरट्यांना वेळीच आवरण्याची गरज आहे. 


""स्मशानभूमीत तांत्रिक कारणाने सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे तेथून रक्षा चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. तो प्रकार गंभीर आहे. त्यामुळे सध्यातरी स्मशानभूमी सर्व बाजूंनी पालिका बंदिस्त करणार आहे. 
यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT