कोरोना 
सातारा

या शहरात पुन्‍हा वाढताोय कोरोनाचा धोका...

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : मार्केट यार्ड परिसरातील बाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्याच घरातील पाच नातेवाईकांसह शहरातील रुक्‍मिणी विहार परिसरातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मार्केट यार्डसह रुक्‍मिणी विहार परिसरातही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निर्माण होणार आहे. 

येथील शनिवार पेठेतील मार्केट यार्ड गेट क्रमांक एक समोरच्या भागात एकजण कोरोनाबाधित सापडला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या संबंधिताच्या नातेवाईकांमध्येही पाच जण बाधित आढळले आहेत. त्याशिवाय रुक्‍मिणी विहार येथेही अन्य एकजण पॉझिटिव्ह आला आहे. मृत कोरोनाबाधिताची पत्नी, सून, त्याचे दोन्ही नातू व अन्य एका नातेवाईकाचा बाधितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

संबंधित भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर नागरी आरोग्य केंद्राच्या पथकांनी त्या भागात तपासणी केली आहे. त्यामध्ये 102 घरांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात किरकोळ आजार वगळता सर्व 510 व्यक्‍तींची प्रकृती चांगली आहे. मात्र, आज त्याच घरातील पाच जण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची काळजी पुन्हा वाढली आहे. शहरात दीड महिन्यापूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिका पॉझिटिव्ह ठरल्या होत्या. त्यांना प्रवासाची हिस्ट्री होती. त्यांच्या सहवासात आलेल्या मंगळवार पेठेतील महिला व अन्य एक महिला बाधित ठरली होती. ते सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी मार्केट यार्ड परिसरातील सत्तरी ओलांडलेल्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ठाण्याहून आलेल्या येथील रुक्‍मिणी विहार परिसरातील एक नागरिक पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित बाधित व्यक्ती एसटी खात्यात नोकरीस आहे. त्याचा स्वॅब घेतल्यानंतर त्वरित येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते. त्यामुळे संबंधित बाहेरील कोणाच्या संपर्कात आला नव्हता. तरीही त्याच्या घरातील पाच जणांना क्वारंटाइन करणार असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT