आठवडा बाजार 
सातारा

बाजार भरेना... पोटाची सोय होईना...

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : आठवडी बाजार बंद असल्याने संबंधित व्यापाऱ्यांना आता पोटासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. यामध्ये साहित्य, भाजीपाला खरेदी व विक्रीचा आर्थिक ताळेबंद लागत नाही. त्यामुळे नियमांचे पालन करुन आठवडी बाजार सुरू करण्याची आमची तयारी असून शासनाने त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

कोरोना या विषाणुजन्य रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाउन काळात सर्वच यंत्रणा बंद झाली. त्याची झळ आता ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई होऊन परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाके रुतली जावू लागली आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजरपेठेवर अवलंबून असते. विशेषत: आठवडी बाजारामुळे दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात रोजच मंडई भरते. तर तालुक्‍यातील दहिवडी, म्हसवड, बिजवडी, राणंद, वावरहिरे, शिंगणापूर, गोंदवले, मलवडी आदी गावात आठवडी बाजार भरत असतात. या बाजारामुळे आसपासच्या गावाबरोबर वाड्यावस्त्यांची सोय होत असते. आठवडी बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबर अन्य ठिकाणचे छोटे मोठे व्यावसायिक आपली दुकाने थाटतात. भाजीपाला, फळे, धान्य, चपला, शालेय साहित्य, खेळणी आदिंची खरेदी- विक्री होऊन सर्वांची सोय होत असते. छोट्या व्यवसायिकांच्या पदरात चार पैसे पडतात. परंतु गेल्या अडीच तीन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांची चांगलीच पंचायत झाली आहे.

हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. हे आणखी किती दिवस चालणार हे मात्र कोणीच सांगू शकत नसल्याने छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता दिल्याने शहरी भागातील व्यवसाय जवळजवळ सुरु झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरु करण्यासंबधी शेतकरी व व्यवसायिक वर्गाकडून मागणी होऊ लागली आहे. 

लॉकडाऊन काळात आठवडी बाजार बंद झाल्याने भाजीपाला व इतर व्यवसाय पूर्णत: बंद झाला. आता थोडीफार सवलत दिली असली तरी पोटासाठी आम्हाला हा व्यवसाय दारोदारी फिरुन करावा लागत आहे. यामध्ये खर्चाचा ताळमेळ बसत नाही. यासाठी आठवडी बाजार सुरू होणे गरजेचे आहे. 
- सतिश खिलारे, 
भाजीपाला व्यावसायिक, पाचवड (ता.माण) 

आठवडी बाजारांमध्ये होणारी गर्दी व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होतेय की नाही याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने घेतली तर आठवडा बाजार भरू शकतात. या व्यावसायिकांकडून स्थानिक प्रशासन कर स्वरुपात प्रत्येक बाजारादिवशी पावत्या घेत असतात. त्यामुळे त्यांनीच ही जबाबदारी घेतली तर नियमांचे पालनही होईल व बाजारही भरतील. 
-अनिल अवघडे, वावरहिरे (ता.माण) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT