आग  sakal
सातारा

सातारा : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतले स्वतःला जाळून

दारूडया नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वताला राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले

विजय लाड ः सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (सातारा) : कोयना विभागातील नवजा या गावातील सीमा रवींद्र जाधव (३५) या विवाहितेने दारूडया नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वताला राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे. यात तिचा दुर्दैवी म्रुत्यु झाला आहे. मृत विवाहितेच्या अंत्यसंस्कारावेळी मुलीच्या आईने व माहेरच्या लोकांनी मृत विवाहतेच्या नवऱ्याला मारहाण करून या प्रकरणी आपल्या मुलीला तिच्या दारूडया नवऱ्याने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची तक्रार कोयना पोलीसांत दाखल केल्यामुळे या प्रकरणी कोयना पोलीसांनी मयत विवाहितेच्या नवऱ्याला अटक केली आहे. मृत विवाहिता सीमा हिच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले आहेत.

याबाबत कोयना पोलीसांनी दिलेली माहिती अशी की रवींद्र भागुजी जाधव (४२) हा आपली आई दोन लहान मुले व बायकोसह नवजा या गावी राहतो. दहा वर्षापासून रवींद्र जाधव आपली पत्नी सीमा हिला आईकडून दारूसाठी पैसे आण म्हणून वारंवार मारहाण शिवीगाळ करत होता.३१ ऑक्टो रोजी कोयनानगर येथे मृत सीमा हिच्याकडे दारू साठी पैशाची मागणी केली.मृत सीमाने याबाबत असमर्थता दर्शवल्याने पती रवींद्र जाधव ने तिला जबरदस्त मारहाण केली होती. यावेळी मृत सीमा हिच्या आई समोर ही मारहाण करण्यात आली होती.

१ सप्टें रोजी सकाळी १० वाजता सीमा जाधव हि स्वयपाक करताना चुलीत होरपळली असल्याचा फोन जावई रवींद्र जाधव याने सीमाची आई संगीता उत्तम कांबळे यांना केला. अत्यवस्थ असणारी सीमा उपचार सुरू असताना मरण पावली आहे. या मृत्यूला सीमाचा दारुडा नवरा हा जबाबदार असल्याचा आरोप मृत सीमा हिची आई संगीता उत्तम कांबळे यांनी केला आहे.

नवजा या गावी आज मृत सीमा हिच्यावरअंत्यसंस्कार झाले आहेत. या वेळी मृत सीमाच्या माहेरच्या नातेवाईकांनी मृत सीमाच्या नवऱ्याला चोप दिला.यामुळे मृत सीमा हिच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले आहेत. तपास सपोनी. चंद्रकांत माळी हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT