Accused arrested
Accused arrested sakal
सातारा

उदयनराजेंच्या सात समर्थकांना इंदापूरात अटक

सिद्धार्थ लाटकर

सातारा : इंदापूर (जि. पुणे) येथील एका उद्याेजकाने राज्यसभेचे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्याविषयी अवमानकारक उदगार काढल्‍याचा दावा करीत काही युवकांनी (youth) (उदयनराजे समर्थक) (udayanraje supporters) संबंधित उद्याेजकाच्या तोंडाला काळे फासले. ही घटना गुरुवारी (दि.२४) इंदापूरात (indapur) घडली. त्यानंतर संबंधितांनी उद्याेजकास इंदापूर पोलिस ठाण्यात नेले. तेथे खासदार उदयनराजे यांच्याबाबत अवमानकारक उदगार काढल्याने उद्याेजकावर कारवाईची मागणी युवकांनी केली. दरम्यान या प्रकरणी इंदापूर पाेलिसांनी सात युवकांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी ई-सकाळशी बाेलताना दिली. या घटनेनंतर संबंधित उद्याेजकास तेथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (satara-trending-indapur-police-arrested-seven-youths-udayanraje-bhosale)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीच्या चौकात भगवे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी दोन आलिशान गाडीतून उतरून उद्याेजकाचे कपडे फाडून, लाथा बुक्या मारुन त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.

हे युवक खासदार उदयनराजेंविषयी अवमानकारक बाेलल्याने चाेप देत आहाेत असे सांगत उद्याेजकाच्या अंगावर काळी शाई फेकत त्यास पोलिस ठाण्यात नेताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पाेलिस ठाण्यात कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवल्‍याचा आरोपही संबंधित उद्याेजकावर करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत हाेते.

दरम्यान ई-सकाळने या प्रकाराची व कार्यवाही माहिती पाेलिस ठाण्यातून घेतली असता संबंधित युवकांवर बेकायदेशीर जमाव जमविणे, काेविड 19 च्या नियमांचे पालन न करणे ( तोंडाला मास्‍क न लावणे, आदी). जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्‍याच्या कारणातून गुन्हा दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी माने यांनी दिली.

या प्रकरणी सात युवकांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आज (शुक्रवार) दुपारी दाेन वाजता दिली. अटक केलेल्या युवकांमध्ये दिपक उर्फ अण्णा सिताराम काटे (वय 28, रा. सरस्वत नगर, इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे) अमोल अंकुश पवार (वय 25, रा. गांधी चौक, नवीन बाजारतळ, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर), कुणाल शिवाजी चव्हाण (वय 33 वर्ष, रा. विजय चौक अकलूज, ता माळशिरस, जि सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय 24, रा. राऊत नगर, अकलूज, ता माळशिरस, जि सोलापूर), किरण रवींद्र साळुंखे (वय 27, रा. भाग्यनगर, भवानीनगर, ता इंदापूर, जि. पुणे), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय 25, श्रीराम नगर, भिगवण रोड, बारामती, ता. बारामती, जि पुणे), सुनील विठ्ठल रायकर (वय 23, राऊत नगर, अकलूज, ता माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. या व्यतरिक्त अन्य चार ते पाच अनोळखी इसमांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पीआय गाेडसे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT