Sahyadri Mountain esakal
सातारा

VIDEO : Wow It's Amazing : शिवसागर जलाशयात काश्मीरची झलक

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' असलेल्या कोयनेच्या (Koyna Dam) शिवसागर जलाशयावर (Shivsagar Reservoir) पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आज पाहायला मिळाली. जलाशयाबरोबरच सह्याद्री पर्वताच्या (Sahyadri Mountain) डोंगररांगा ही धुक्यात न्हाऊन निघाल्या होत्या. जणू, काही बर्फाची पांढरीशुभ्र चादर ओढल्याचा आभास येथे होत होता. अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी असे नयनरम्य वातावरण येथे तयार झाले होते. (Satara Trending News Foggy Scene Sahyadri Mountains Amazing Climate)

महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' असलेल्या कोयनेच्या शिवसागर जलाशयावर पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आज पाहायला मिळाली.

Koyna Dam

साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर आणि मे, जून महिन्यात असे अद्भुत नजारे पाहण्याचा योग येतो. पहाटेपासून ते साधारणपणे नऊ वाजेपर्यंत हे दृश्य दिसत राहते. सद्यस्थितीत कोरोना लाॅकडाउनमुळे (Corona Lockdown) कास, बामणोली, सह्याद्रीनगर परिसरात पर्यटकांना फिरता येत नसल्याने हा नजारा पाहण्यापासून अनेकांना वंचित राहावं लागतंय. डोंगराच्या उंचावर थांबून खाली अथांग पसरलेलं धुक्याचं ढग पाहताना आभाळाच्या वरती आपण असल्याचा आभास होतो. हा नजारा कितीही वेळ पाहिला, तरी तेथून पाय काढू नये, असेच नैसर्गिक सुंदर वातावरण असते.

Sahyadri Mountain

सह्याद्रीनगर गावच्या जन्नी देवी मंदिरापासून जवळच असलेल्या कोयना दर्शन पाॅईंटवरून कोयनेचं खोरं पाहणं खूपच सुंदर असतं. त्यात धुक्याची चादर असेल, तर स्वर्गाहून सुंदर नजारा असतो. शासनाने सह्याद्रीनगर येथे पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा विकसित कराव्यात.

-जयेश शिंदे, सह्याद्री नगर

Satara Trending News Foggy Scene Sahyadri Mountains Amazing Climate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT