सातारा

तब्बल 29 काेराेनामुक्त हाेताच हर हर महादेवाचा आवाज घुमला; कृष्णाची ‘सेंच्युरी’

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असताना उपाचर घेवून कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात कऱ्हाड येथील कृष्‍णा, सह्याद्री रुगणालयातून आजअखेर अनेक रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज (साेमवार) एका दिवशी कऱ्हाडमधील कृष्णातून 19, सह्याद्री हॉस्पिटल व पार्ले येथील कोव्हीड केअर सेंटरमधून प्रत्येकी पाच अशा 29 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्जार्च देवून घरी सोडले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत कृष्णातून रूग्णांना डिस्जार्च दिला. कृष्णाने आज कोरोनामुक्त रूग्णांचे शतक पूर्ण केले. आज डिस्जार्च मिळालेल्यांमध्ये कऱ्हाड तालुक्यातील दहा तसेच पाटण व खटाव तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आजच्या तीस जणांच्या डिस्जार्चमुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 190 वर पोचली आहे.

कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक बाधीत सापडून ते झपाट्याने बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यात येथील कृष्णा रूग्णालयाने आज कोरोनामुक्तचे शतक पूर्ण केले. जिल्हाधिकारी सिंह यांच्या उपस्थितीत 19 रूग्‍णांना आज घरी सोडण्यात आले. यावेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका प्रांताधिकारी उत्तम दिघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, दिपक रैनाक आदींसह स्टाफ उपस्थित होता.
    
कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या कोरोनामुक्त रूग्णांना जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांत गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिरळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी अशा 19 जणांचा समावेश आहे. यावेळी श्री. सिंह म्हणाले, कृष्णामधून आत्तापर्यंत 100 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कोरोनामुक्तीच्या लढाईत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व अन्य स्टाफने अमूल्य योगदान दिले आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना विशेष वॉर्डकडे जाण्यास केलेल्या स्वतंत्र मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.
 
सह्याद्री हॉस्पिटलमधूनही सहा रूग्णांना आज डिस्जार्च देण्यात आला. तेथील डॉक्टरांच्या उपस्थित टाळ्यांच्या गजरात  कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च मिळाला. तसेच तपासणीत पॉझिटिव्ह रिपोर्ट येवूनही किरकोळ लक्षणे असणाऱ्यांना प्रशासनाने पार्ले येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवले होते. त्यातील पाच जणांचे तपासणीनंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या पाच जणांनाही आज डिस्जार्च दिला. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या उपस्थितीत पाच कोरोनामुक्त रूग्णांना घरी सोडण्यात आले. एकाच दिवशी तीन ठिकणाहून 29 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्जार्च मिळाल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान आज डिस्जार्च मिळालेल्या 29 पैकी कऱ्हाड तालुक्यातील दहा तसेच खटाव तालुक्यातील दोन गारवडी, मांजरवाडी, मायणी येथील तसेच जावळी तालुक्यातील वारूशी येथील व उर्वरीत पाटण तालुक्यातील रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. 

'ताे" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत

संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात घरात कोणाला काय हवे, काय नको याची काळजी घेतली. वेळ प्रसंगी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या बाहेर जाण्याच्या हट्टाला खंबीरपणे नाही म्हणण्याचे धाडसही दाखविले. वाचा तिच्या भावना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT